पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक्षय बापुडा झाला, तसा मोरया गोसावी पुढे होत खाटेच्या समोर बसला. आणि खणखणीत स्वरात उच्चार केला, ‘‘शिवशंभो हर हर!' आणि वेदनेनं तडफडणाच्या गड्याच्या तोंडावरून, देहावरून व सर्पदंश झालेल्या पायावरून हळुवारपणे हात फिरवायला सुरुवात केली. “बेटा, शांत हो, शांत हो! तुझ्या महाप्रस्थानाची वेळ आली आहे. ते शुभ आहे. हा मलिन झालेला देह तुला आता त्यागायचा आहे आणि लवकरच तुला नवा उत्तम देह मिळणार आहे. तू तूच राहणार आहेस, नंतरही, अनंत काळासाठी. कारण आत्मा अमर असतो. बस्, शिवशंकराचे नामस्मरण कर आणि शांतपणे वेदना सहन कर अक्षय थिजल्याप्रमाणे मोरया गोसावीचे शब्द ऐकत होता. मनात पुन्हा प्रश्नांची वादळे उमटत होती. त्याचं मरणाचं तत्त्वज्ञान त्याला फोल वाटत होतं. वृद्धापकाळी, जराजर्जर अवस्थेत जगण्याच्या यंत्रणा निकामी होत मरण जवळ येतं तेव्हा कदाचित हा उपदेश योग्य होता पण आज जेमतेम तिशीतला तो गडी साप चावून उपचाराअभावी मरत होता. आणि हा गोसावी त्याला जीवनाच्या अनंतत्वाचं तत्त्वज्ञान सांगत होता. पढिक पंडिताप्रमाणे का मूर्खाप्रमाणे?... तो विषण्ण हसला! पण मोरया गोसावीच्या शब्दात काय जादू होती की, तो विव्हळणारा गडी शांत झाला होता. आणि अस्फुट स्वरात शिवस्तुती करीत त्याच्यासमोर शांतपणे त्यानं अंतिम श्वास सोडला! त्यानंतर गोसावी त्याला मास्तराच्या घरात घेऊन गेला. त्यांची लेक अद्यापही बाळंतवेणा काढीत तळमळत होती. गोसावीनं तिच्याही चेह-यावर हात फिरवला, तसाच नऊ महिन्यांच्या गर्भारानं फुललेल्या पोटावरूनही. अक्षय पाहात होता. मोरया गोसावीच्या चेह-यावर तेच कनवाळू वत्सल मंदसं स्मित होतं, त्यानं आता त्याला काहीसं भारल्यासारखं वाटत होतं! “गुरुजी, काही काळजी करू नका. महादेवाचं स्मरण करा. तुमची लेक सुखरूप बाळंत होईल. तसं झालं आणि मुलगा झाला तर मी त्याचं नाव मोरया ठेवीन महाराज. मास्तरांची पाठ थोपटीत मोरया गोसावी बाहेर आला व देवळाकडे चालू लागला. अक्षयनंही त्याची पाठ धरली! पुन्हा देवळात त्याचं पद्मासन घालून समाधी लावणं आणि अक्षयचं त्याच्याकडे एकटक पाहात मनातील विचारांचा, प्रश्नांचा शोध घेणं, हा क्रम सुरूच होता! । ‘‘महाराज... आता त्यांच्याशी बोललंच पाहिजे, असं वाटन अक्षय तात्र स्वरात म्हणाला, तसं मोरया गोसावीनं डोळे उघडले व म्हटलं, “बोल बाळ, चिंताक्रांत दिसतोस. गोंधळलेला वाटतोस. । “हां महाराज, गेले दोन रात्री व तीन दिवस मी तुमच्या संगतीला आहे. मंत्रचळ १६२ ॥ लक्षदीप