पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाला होता. नेहाची टोकाची भूमिका नंदिताला पटली नव्हती. पण तिला स्वत:ला त्यामुळे लढायला बळ मिळालं होतं! | आत हॉलमध्ये ते तिघे उरले होते. वादळानंतरची शांतता जाणवत होती. अस्वस्थ अन् बेचैन नेहा कोचावर बसली होती. हाताच्या खळगीत हनुवटी रुतवून, एका बाजूला कोचाच्या हातावर तिच्याकडे पाठ फिरवून सिद्धार्थ अवघडलेल्या अवस्थेत बसला होता. तिच्यापासून मनानं दूर गेलेला नामदेव कोचाच्या दुस-या बाजूला सिद्धार्थकडे पाठ फिरवलेला. त्याला आतापासूनच खाजगी कंपनीची, भक्कम आर्थिक सुखाची व सुखासीन उपभोगी दुनिया खुणावत होती. नेहाच्या मनात नक्षलवाद्यांची वाचलेली माहिती घोळत होती. एका अज्ञाताच्या खुणा तिला ऐकू येत होत्या. सिद्धार्थचा हॅम्लेट झाला होता. आपण सिस्टिमविरुद्ध झगडण्यासाठी की त्याच सिस्टिममधील आकर्षणामुळे तिचा भाग बनण्यासाठी आपला ट्रॅक बदलत आहोत, याचा त्याला उलगडा होत नव्हता. मात्र यापुढे यू. पी. एस. सी. व एम. पी. एस. सी. बंद स्पर्धा परीक्षा नाही. ऑफिसर होणे नाही. यावर तिघेही ठाम होते. तिघाना आपल्या तीन दिशा निवडल्या होत्या, मीडियाच्या साक्षीनं! सारे पत्रकार व मीडियावाले निघून गेले होते. तिथे फक्त पूर्वा रेंगळत होती तो सध्या पत्रकारितेचा कोर्स व एका वृत्तपत्रात अर्धवेळ कामही करीत होती. त्याच वेळा तिची स्पर्धा परीक्षेची तयारीदेखील चालू होती. त्या तिघांनी माजी कुलगुरू असलेल्या व आज जेलबंद असलेल्या चेअरमनला काळे फासल्यापासून त्यांची स्टोरी ती करात होती. आजही तिला बराच मसाला मिळाला होता. पण त्यावरून कव्हर स्टोरी' करावा का त्याचं अॅनॅलिसिस करणारं वार्तापत्र करावं, हा प्रश्न तिच्यापुढे होता. का त्या तिघांचं जीवन जाणून घेऊन त्याची ‘ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी' करावी? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं. त्यासाठी ती तेथे थांबली होती. ते तिघे जवळजवळ पण तीन वेगळ्या दिशांना तोंड करून विचारमग्न अवस्थत बसले होते. पूर्वाला एकदम राज कपूरचा ‘जोकर' सिनेमाचा एक छोटा सीन आठवला. विमान प्रवासात राज कपूर, राजेंद्रकुमार व पदमिनी ‘लाईफ' ‘टाईम' व ‘फॉर्म्युन' हा तीन मासिक चाळत असतात; त्या तीन मासिकांची नावे त्यांच्या भावी जीवनप्रवासाचा द्योतक असतात. समजा, या तिघांच्या लाईफवर कुणी सिनेमा काढला तर या तीन भिन्न दिशा तोंड करून बसलेल्या तिघांच्या हाती कोणती मासिकं द्यावीत? नामदेवासाठी ‘फॉर्म्युन' शोभेल. कारण तो उद्याच्या बड्या प्रायव्हेट कंपनीचा सुखवस्तू एक्झिक्युटिव्ह बनणार आहे. सिद्धार्थला 'टाईम' देणं बरं, उद्याची वेळच सांगेल की तो सिस्टिम सुधारेल, का सिस्टिमचा भाग बनून प्रवाहपतिताचं जीवन जगेल? आणि नेहासाठी नक्कीच ‘लाईफ' मासिकच दिलं पाहिजे. जीवन अतक्य १५० । लक्षदीप