पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कादंबरीलेखनात त्यांनी सतत नवेनवे विषय प्रवेशित केले आहेत.मराठी बालमजुरांच्या समस्याग्रस्त जीवनाचे चित्रण या कादंबरीत आहे.बालमजुरांच्या जगाची दाहकता किती तीव्र व भयकारक आहे यांची प्रचिती या कादंबरीत आहे.अरुण पालीमकर या मिशनरीवृत्तीच्या लाढाऊ कार्यकत्र्याच्या नजरेतून बालमजुरांचे विश्व न्याहाळले आहे.बालमजुरीच्या प्रश्नाला किती कंगोरे आहेत याचे समाजशास्त्रीय संवेदन या कादंबरीत आहे.साधारणतः चारेक वर्षाच्या कालावकाशाचे चित्रण या कादंबरीत आहे. स्वत: अरुण बालमजूर होता.कुटुंबातील टोकाच्या भांडणामुळे तो परागंदा होतो.तो शिवकाशीच्या एका फटाके फॅक्टरीत काम करतो.तिथूनही कसाबसा जीव वाचवून पुन्हा आपल्या शहरात येतो.तो ‘स्वप्नभूमी’ ही बालहक्कासाठी लढणारी संस्था स्थापन करतो.यासाठी शहरातील या प्रश्नासाठी व मुलांसाठी तो झटत राहतो.दुकाने,कारखाने,वीटभट्टी,हॉटेलमधून काम करणारी मुले व त्यांचे विश्व या कादंबरीत आहे.शारीरिक व मानसिक पातळीवर त्यांचे पराकोटीचे शोषण होते.समाजाच्या अत्याचाराचे ते बळी होतात.त्यांचे बालपण व जीवनातील आनंदमयता हरवून जाते.वेठबिगार म्हणून त्यांना वागविले जाते.राज्यकर्ते,प्रशासन व मुजोर मालकवर्ग यामध्ये सहभागी असतो.त्यांचे हितसंबंध असतात.अनेक अनाम मुलांचे मूक आक्रोश संवेदनहीन समाजाला ऐकू येत नाहीत.एक तर तो केवळ निळवलेला आहे.याप्रकारची व्यवस्था ही जणू काही मुलांची यातनागृहेच आहेत.या साच्या प्रश्नासाठी अरुण काही मित्रांना बरोबर घेऊन बालमजुरांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम घेतो.त्यात त्याला यशही येते.सतत आपल्यातला लढाऊपणा जिवंत ठेवतो.बालमजुरांच्या कळवळ्यापोटी सहानुभावाने तो हे करत राहातो. त्याची कहाणी ‘हरवलेले दिवस' मध्ये आहे.
 अरुण या मध्यवर्ती पात्राच्या चित्रणातून कादंबरीची संहिता घडते.विविध घटनाप्रसंगातून व त्यांच्यातील चर्चेतून कादंबरीचे कथन आकाराला आलेले आहे.बालमजूर,झोपडपट्टी,बूटपॉलिश करणारी मुले,कारखान्यात,हॉटेलात काम करणारी मुले यांचे बारकाईने चित्रण या कादंबरीत आले आहे. त्याचबरोबर प्रशासनव्यवस्थेचेही या जीवनाकडे पाहण्याचे सूक्ष्मत-हेचे चित्रण आहे.एका अलक्षित शोषित समुहाचे चित्रण या कादंबरीत आहे.भूत आणि वर्तमान यांच्या कालसंदर्भात ते केले आहे.बालहक्कासंदर्भात जे विविध कायदे झाले,त्यासंबंधी जाणीवजागृती झाली,त्या माहितीचा उपयोग कादंबरीत केला आहे.

 जिल्हा प्रशासन व न्यायपालिकेतील राजकारणाचे चित्रण व त्यांच्या कादंबरीवाङ्मयाचा महत्त्वाचा संदर्भबिंदू आहे.'ऑक्टोपस' ही महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे चित्रण करणारी कादंबरी आहे.आनंद पाटील या प्रामाणिक काम करणाच्या जिल्हाधिका-याच्या नजरेतून किडलेल्या अष्टाचारी जगाचे विश्व या कादंबरीतून मांडले आहे.आनंद पाटील व भगवान काकडे यांच्या समांतर कथेतून या कादंबरीचे

१४ । लक्षदीप