पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पण या तीन मुलांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे. तेवढंच परिमार्जन. पापक्षालन. इन्स्पेक्टर साहेब - सूर्यवंशी म्हणाले, “मी गृहमंत्र्यांशी बोललो आहे. यांचं पोलीस रेकॉर्ड बनवू नये म्हणून. उद्या ते पास झाले तर पोलीस रेकॉर्ड त्यांच्या नोकरीआड येऊ नये यासाठी. रिअली आय डोंट नो द प्रोसिजर. पण ही प्रॉमिस मी टू लुक इन टू इट. तुम्ही तेवढं -" “नक्की सर. इन्स्पेक्टर म्हणाला, “तुम्ही मला ओळखणार नाही सर. पण मी तुमच्याच कॉलेजचा विद्यार्थी. तेव्हा आपण प्राचार्य नव्हता. माझी सायन्स साईड होती. त्यामुळे तुमचा प्रत्यक्ष विद्यार्थी नव्हतो; पण तुमचा आदर्श, तुमची तत्त्वं मला माहीत आहेत सर. कदाचित तुम्हाला मला एकेकाळचा तुमचा विद्यार्थी मानणं योग्य वाटणार नाही. कारण... कारण... नो नीड टू टेल यू, बट आय विल डू सर्टनली समथिंग फॉर दीज गाईज. आय प्रॉमिस! | पोलीस स्टेशनच्या बाहेर सूर्यवंशी सर, नंदिता मॅडम व ते तिघे आले, तेव्हा पत्रकार व चॅनेलवाल्यांनी त्यांना गराडा घातला. त्यांना शांत करीत सूर्यवंशी म्हणाले, प्लीज, आज नको. उद्या माझ्या घरी या, तेव्हा त्यांच्याशी बोला.” | आणि तिघांना उद्देशून ते म्हणाले, “तुम्ही माझ्याकडे काही दिवस राहणार आहात. माझा मोठा सरकारी बंगला आहे. तिथं मी एकटाच असतो. तेव्हा चला. थक्यू नंदिता मॅडम, फॉर युवर को-ऑपरेशन! “नो सर, तुमच्याप्रमाणे मलाही वाटलं म्हणून मी सहकार्य केलं. जसं तुम्ही सफाईचे काम करीत आहात, तशीच मीही प्रयत्न करतेय! हे तिघे बळी जाता कामा नयेत एवढंच मला वाटलं.” “आय अॅडमायर युवर करेज अॅण्ड डेडिकेशन टू द कॉज, नंदिता. सूर्यवंशी म्हणाले, “मी बोलूनचालून प्राध्यापक, तुम्ही सनदी अधिकारी, मंत्रालयीन कॅडरचे. उद्या तुम्हालाही आय. ए. एस. चे चान्स पदोन्नतीने असताना हे - हे कशासाठी? “या प्रश्नाचं एकच उत्तर असतं सर... आपला विवेक. आपला कॉन्शस. तो उगी बसू देत नाही - नंदिताचं ते स्मितही काहीसं खिन्न व अट्टाहासाने ओढून आणलेल्या चंद्रबळासारखं होतं. । “ओ. के. सर. मला गेलं पाहिजे. इथून दहिसरला जायला दीड तास लागेल. उद्या मीही येते बंगल्यावर. “बैंक्यू मॅम...' नेहा नंदितापुढे नमस्कार करायला वाकली, तेव्हा तिला मिठीत घेत नंदितानं नमस्कार करू दिला नाही. नेहा पुटपुटत म्हणाली, “तुम्ही - तुम्ही माझ्यासाठी हे... हे... एवढं... ‘‘पुरे. काही बोलू नकोस. उद्या आपण भेटूच! १४४ । लक्षदीप