पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही!
 हा - हा माझ्यावर अन्याय असणार आहे. तो नाही मी सहन करणार. आय मस्ट फाईट.
 पण अवघ्या दोन रात्रीच्या पोलीस कस्टडीनं आपली लढण्याची खुमखुमी जिरली तर नाही? नवरयाच्या छळामुळे त्याला मारून तुरुंगात आपल्या सोबत असलेल्या स्त्रीला आपण काय म्हणालो होतो? “त्याचा खरं तर खून करायला पाहिजे होता आम्ही. पण वाईट वाटतं की, तसं मी करू शकत नाही. कारण या हातानं कुणावर मला अन्याय करता येत नाही! आणि त्याचं वाईट वाटतं."
 अन्याय सहन करणं हा मोठा अपराध आहे. तो - तो मी का सहन करू? येस् - मला काही तरी केलं पाहिजे. समथिंग ड्रास्टिक, समथिंग ड्रामॅटिक!
 पण ही जेलची कोठडी केव्हा संपेल? कुणी आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करेल?
 आणि अचानक सुटकेची, जामीन झाल्याची वार्ता.
 कोण धावून आला त्यासाठी?.... नक्कीच सर असतील!

 पोलीस इन्स्पेक्टरच्या कार्यालयात जेव्हा सिद्धार्थ, नामदेव व नेहाला आणण्यात आलं, तिथं सूर्यवंशी सर आणि एक मॅडम खुर्चीवर बसल्या होत्या. त्या - त्या एम. पी. एस. सी. च्या सेक्रेटरी तर नाहीत? नंदिता मॅडम? होय, नक्की त्याच.
 “सिद्धार्थ, नामदेव - तुमचा सरांमुळे जामीन झाला. यापुढे नीट वागा. इन्स्पेक्टरनं करड्या आवाजात उपदेशाचा डोस पाजीत म्हटलं, “आणि नेहा, नंदिता मॅडमनं तुझ्या वर्तनाची हमी दिलीय. तू सुद्धा..."
 "नीट वाग.. असंच म्हणायचं ना तुम्हाला सर?"
 नेहा तिच्या नेहमीच्या आक्रमक सुरात बोलून गेली. “मान्य, की तोंडाला काळ फासणं हा गुन्हा आहे, पण पैसे घेऊन पास करणं हा गुन्हा नाही का? सारी यत्र। वेठीस धरून एका डी. आय. जी. च्या तीन - तीन मुलांना हेराफेरी करून डी. वाय. एस. पी. एकाच बॅचला करणं हा त्यापेक्षा कितीतरी अधिक पट गुन्हा नाही? तुम्हीच सांगा, प्रामाणिकपणे अभ्यास करून सरळ मार्गानं आम्ही अधिकारी, कदाचित डा. वाय. एस. पी. होऊ इच्छितो, पण आम्हाला सरकारनं न्याय दिलाय? केवळ आम्हा तिघांनाच नाही, लाखो तरुणांना असंच वाटतंय. आमच्या जिवाशी सरकारी यंत्रणा क्रूर खेळ खेळतेय... तरीही-"

 “परे नेहा.' नंदिता म्हणाली, “तीन भावांचं एकाच वेळी डी. वाय. एस. पा. व्हायचं ते प्रकरण मीच नाही का शोधून काढलं? मीही त्याची काही कमी किंमत नाही मोजली बेटा. पण असं अविचारानं वागून का न्याय मिळणार आहे?"

१४२ ॥ लक्षदीप