पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "पण सर?"
 "ही डायरी तिचा आत्मा होता. मन होतं. ते माझ्याजवळ आहे. त्याला भडाग्नी देऊ या.”
 गुरूनं डायरीचं एकेक पान फाडून लायटरनं पेटवत जाळायला सुरू केलं. व्यंकट अवाक होऊन पाहत राहिला.
 गुरू केवळ शेवटचं पान व फोटो जाळणार नव्हता. तो त्याच्यासाठी उर्वरित आयुष्य जगण्यासाठी बळ देणारा अमोल ठेवा होता. विशेषतः तिच्या भावभिन्या मिठीची याद देणारा फोटो. आणि डायरीच्या शेवटच्या पानातली तिची प्रेमाची कबुली. मला पुनर्जन्म हवा आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी. आपल्या सहजीवनासाठी, कारण आय लव्ह यू सो मच!”


०- ०- ०
१३८ । लक्षदीप