पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर, विवाहितेवरही आपल्याच नव-याकडून बलात्कार होतो. याची त्या रात्री जाणीव झाली. माझ्या वाट्याला हे भोग का यावेत? तो खरंच पराक्रमी होता. त्या रात्रीच्या बलात्कारी संबंधातून मला दिवस राहिले. हा त्याच्यासाठी त्याच्या तथाकथित पौरुषाचा विजयाचा क्षण होता. | काही दिवस तो माझ्याशी ब-यापैकी वागत होता, पण मी अस्वस्थ होते. माझी बरबाद होणारी क्रीडा कारकिर्द दिसत होती. मी केवळ त्याच्यावरच नव्हे तर स्वत:वर आणि पूर्ण जगावरही वैतागले होते. माझा हा वैताग वांझोटा आहे. हे कळत होतं, पण तो जात नव्हता. | एक दिवस मला तो दवाखान्यात घेऊन गेला. माझ्या नकाराला न जुमानता सोनोग्राफी करावयास लावली. गर्भाचं लिंग कळावं म्हणून. ते जेव्हा कळलं आणि मला मुलगी होणार असं डॉक्टरांनी सांगितलं, तो म्हणाला, "डॉक्टर उद्या - परवा आम्ही येतो. गर्भपात करायचा, आम्हाला पहिली बेटी नको.” | मध्यरात्र झालीय. माझा नवरा ढाराढूर झोपलाय. आणि मी डायरी लिहिते आहे. अस्वस्थ मनाच्या उद्रेकाला वाट करून देण्यासाठी. मी-मी काय करू? माझ्या होणा-या गर्भाला स्त्रीलिंग आहे म्हणून अॅबॉर्शननं खुडून टाकू? हा - हा माझ्या स्त्रीत्वचा अपमान आहे; पण मला ते रोखता येईल? माझा नवरा मानेल?" वाचताना गुरू क्षणाक्षणाला धुमसत होता. हादरत होता. ओ माय गॉड, बेबी, खरंच तुझा नवरा सैतान आहे गं.... मला - मला हे आधी कळलं असतं तर मी त्याचा खून केला असता.... होय, तू मला हे कधी फोननं किंवा पत्रानं का नाही सांगितलं बेबी? एवढा का मी परका होतो? डायरीची पुढील पानं वाचायला धीर होत नव्हता. तरीही गुरू हिंमत करून वाचू लागला. मला माझा गर्भपात रोखता आला नाही. काही काळ मी सुन्न होते. पण त्यातून स्वत:ला सावरून फिटनेससाठी व्यायाम सुरू केला. बालाजी सकाळी उशिरा उठायचा. तोवर मी रनिंग करून यायची. पण माझ्या सासूला कुठं हे मान्य होतं? तिनं बालाजीचे कान भरले. पुन्हा मारहाण आणि सक्त ताकीद की, 'खेळ - क्रीडा सारं बंद. आता संसार करायचा फक्त." मी कळवळून म्हणाले. “फार नाही, वर्ष दोन वर्षाचा प्रश्न आहे. एवढी एक स्पर्धा होऊ दे, मग मी सारं सोडून देईन. जरा विचार करा, माझी ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात निवड झाली तर किती नाव होईल. आपण दोघंही सिडनीला जाऊ. तो देश पाहता येईल." “पुरे ही थेरं. तुझ्यामुळे मी ओळखला जावा तुझा नवरा म्हणून हे मला जमणार नाही. बायको म्हणजे नव-याच्या पायातली वहाण. ती पायातच हवी. मी डोक्यावर घेऊन मिरवणार नाही. समजलं?” १३६ । लक्षदीप