पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या गुरूच्या हवाली करावं लागेल. तुझ्यापासून मी किमान राष्ट्रीय पदक मिळणारी धावपटू निर्माण करेन.”
 आज मला माझा गुरू भेटला होता आणि त्याच्या हाती मला सोपविण्याचा निश्चय केला होता.”
 त्यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग त्याच्या मनात डायरी वाचताना जागृत झाला होता. गुरूनं आणखी एक मधलं पान उघडलं.
 “मला कळत नाही, गुरू माझ्याकडे असं का पाहतात? सराव झाल्यावर दम खाण्यासाठी मी स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत वर जाऊन बसते. ताजी हवा मिळते म्हणून. तेव्हा माझ्यामागं गुरू पळत येतात. माझ्या हाती टॉवेल देतात घाम पुसण्यासाठी व थंड पाण्याची बॉटल...
{gap}}पळून तापलेलं व भात्याप्रमाणे फुसफुसणारं शरीर शांत होण्यासाठी मी वारा घेत बसून असते. आणि गुरू माझ्याकडं अधूनमधून अनिमिष नेत्रानं पाहत असतात.... वा-यानं भुरभुरणारे केस आवरीत मी जेव्हा त्यांना पाहते, ते नजर चुकवतात.
 या खेळाची मला गंमत वाटते. मनात काहीतरी उष्यागोड वाटतं. काय ते कळत नाही.”
 पुन्हा एकदा गुरू तो फोटो पाहतो. हा तिचा चेहरा एका अस्सल स्त्रीचा आहे, जी एकाच वेळी माता, कन्या, सहचरी व सखी सारं - सारं काही आहे. पुरुष तत्त्वाला आपलंसं करणारी प्रकृती. सखी.... मनात काहीतरी झणझणतं - सखी.
 आणि काय नवल! गुरू पुन्हा मधलं एक पान उघडून वाचतो.
 “गुरू, तुम्ही माझे कोण आहात?
 टीचर, कोच या अर्थानं गुरू तर आहातच, पण त्याहून माझे चांगले मित्र आहात. मित्रापुढे माणसाला मोकळ, दिलखुलास वाटतं. सारखं चिवचिवत राहावसं वाटतं. अगदी साधी, निरर्थक बाबही सांगावीशी वाटते. मला तुमच्या सहवासात तसं वाटलं. म्हणून तुम्ही माझे सच्चे व एकमेव मित्र आहात! आणि गाईडही. मला मार्गदर्शन करणारे.
 फिलॉसॉफर! नक्कीच. कारण मला माझ्या जीवनाचे सार्थक कशात आहे. हे पटवून दिलंय. तुमच्यामुळे माझ्या जीवनाचं मी तत्त्वज्ञान बनवलं. वेग आणि धावां हा माझ्या जीवनाचा मूलमंत्र बनला. त्यासाठी साधना, शरीराला व्यायाम, आहार व नियमित जीवनशैली - त्यासाठी हरेक क्षण सजग ठेवणं, वेग हा माझा धर्म आणि १ळणं हे माझं कर्मकांड चांगल्या अर्थानं बनलं. सो यू आर माय फिलॉसॉफर.

 पण याहून तुम्ही माझ्यासाठी जादा काही आहात? आपलं हे नातं सुप्त मनाला जावल, पण त्याला नाव काय द्यायचं? हा मला पडलेला प्रश्न होता, पण अचानक त्याला नावे सापडलं, पण त्याचा अर्थ अद्याप अस्पष्ट आहे. मात्र त्या अपूर्णतेही ‘गोडी

लक्षदीप 1 १३३