पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होता. आता तूच नाहीस तर... तर..."
 आपलं आणि वेबीचं गुरू-शिष्येपेक्षा अधिक खोल नातं होतं. ते न कळताच संपलं. आपण त्यावर कधी विचार केला नाही. पण बेबी डायरी लिहायची हे आपल्याला माहिती होतं.
 "डायरीलेखन हा माझा स्वत:ला जाणायचा प्रयत्न असतो तर... प्रत्येक वेळी तो सफल होतोच असं नाही; पण मी तो प्रयास करते... ही-ही माझ्यासाठी एक प्रकारची मनोक्रीडा आहे. जशी मी सुसाट पळते. तसंच माझं मनही वायुवेगानं पळतं. फक्त त्याला दिशा नसते. लक्ष्य नसतं. विनिंगपोस्ट नसतं, जिथं थांबायचं असतं. त्यामुळे मन सतत पळतं. अचपळ मन माझे नावरे आवरिता' शाळेत असताना रामदासांची करुणाष्टके मी पाठ केली होती. पाठांतर स्पर्धेसाठी. त्यातली ही एक ओळ आहे. मला सार्थ लागू होणारी. या माझ्या अचानक अचपळ मनाचा शोध घेण्यासाठी हे डायरी लेखन!”
 गुरू पुढे झुकत डायरी हाती घेतो. आणि मधलंच कुठलं तरी पान उघडतो. तिथं त्यांचा कर्नालचा त्या परदेशी तरुणीनं घेतलेला फोटो असतो. तो पाहताच तो पुन्हा अनावर होतो. काही वेळानं स्वत:ला सावरत तो मजकूर पुढे वाचू लागतो.
 “गुरू... डायरीत मी तुम्हांला कधीच 'सर' संबोधलं नाहीय. कारण मला माहित नाहीजुन्या जमान्यातला गुरुदत्त मला मनस्वी आवडतो. तुमचं तेच नाव मला म्हणूनच प्रिय आहे. आजचा दिवस माझ्यासाठी अनेक अर्थानं अविस्मरणीय आहे. शंभर मीटर धावण्यातला नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवीत सुवर्णपदक पटकावणं हा निखळ आनंदाचा क्षण. हे पदक मी तुमच्या चरणी अर्पण केलंय. ही धावपटू बेबी राणे तुमची निर्मिती आहे... मी नाही, तुम्ही जिंकलात सर!
 पण तुमच्या नव्या-नव्या, पहिल्यापेक्षा मोठ्या स्वप्नांनी मला आजवर नेहमीच मोह घातला आहे. नव्हे, तुमच्या स्वप्नपूर्तीचं मी मला साधन समजते; पण तुमचं आजचं माझ्याबद्दलचं ऑलिम्पिकचं स्वप्न- मला प्रथमच भीती वाटली सर. मी-मी कदाचित पुरं नाही करू शकणार, प्रथमच मी साशंक आहे. थोडीशी भयभीतीही...
 माझं लग्न ठरलंय. ते होणारच. मला ते टाळता येणे शक्य नाही; पण त्याचा ६ का वाटत नाहीये? मनात कसलं तुफान उठलंय? कळत नाहीय.
 आजचा एक उत्कट क्षण साकारणारा त्या विदेशी तरुणीनं टिपलेला फोटो आहे. त्या फोटोतले मी माझे भाव वाचायचा प्रयत्न करीत आहे.

 मो-मी तुम्हाला नकळत आवेगानं मिठी घातली. तुमचे वाहणारे अश्रू ओठांनी ल. ती उत्स्फूर्त कृती होती. पण फार खरी व निर्मळ होती. मला त्याचा कधीही १२चात्ताप होणार नाही. काही झालं तरी हा फोटो मी जपून ठेवणार. डायरीत तो खुणेसाठी वापरणार..."

लक्षदीप ॥ १३१