पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "ते सांगता येत नाही, पण का कोण जाणे, माझ्या मनाला कसले संकेत मिळतात की, मला नाही कळत मला काय वाटलं ते...' बेबी म्हणाली, “मला आज जागून डायरी लिहिली पाहिजे. स्वत:ला शोधण्यासाठी."
 “पण बेबी, जास्त जागरणं नकोत. उद्याच्या रिले स्पर्धेत तुला आजचा बहारदार परफॉर्मन्स रिपीट केला पाहिजे."
 "तुम्ही माझ्यावर नाराज नाहीत ना?"
 "कशाला मी नाराज होईन?' गुरू स्वत:च्या मनाला आवरीत चंद्रबळ आणीत, मुद्रा हसरी करीत म्हणाला, “पण त्यासाठी एक प्रॉमिस हवं. उद्या सुवर्णपदक मिळायला हवं!"
 "डन सर. मी उद्याही सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देईन.”


 .....व्यंकट त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला, “सर, मी तुमची अवस्था समजू शकतो. आज पोस्टमार्टम होईल. त्यामुळे उद्या अंत्यसंस्कार होतील.. तोवर विचार करा. वैनीची अंतिम इच्छा पूर्ण व्हायला हवी. मी तुम्हाला हमी देतो. फक्त तुम्ही हो म्हणायचं आहे.”
 "लेट मी थिंक, अजून मी धक्क्यातून सावरलो नाहीये व्यंकट,' गुरू म्हणाला. बेबी आता आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही आणि तू अंत्यसंस्काराची बात करतो आहेत... संध्याकाळी माझ्याकडे ये. मग आपण बघू काय करायचं ते..."
 “ओके सर', व्यंकट म्हणाला. आपल्या खांद्यावर लटकलेल्या बँकेतून त्यानं एक डायरी काढली. ती त्याला देत म्हणाला, “सर, ही बेबी वैनीची डायरी आहे. ती मला तिच्या बेडखाली मिळाली. त्यात तुमचा फोटो होता... म्हणून तुम्हांला ती देतोय."
 "व्यंकट... तू-तू... मला-मला..."
 नाही सर. मी कसलीही गैरसमजूत करून घेत नाहीय... व्यंकट किती समंजस व सुजाण बोलत होता. आश्वासकही.
 “मीही तुम्हांला मानतो. माझ्यासाठी पण तुम्ही आजही गुरू आहात. मी मात्र तुमचं शिष्यत्व निभावू शकलो नाही. तुमच्या माझ्याकडून फार अपेक्षा होत्या; पण... खैर. जाऊ द्या ते. ही डायरी घ्या सर..."

 घरी आला तरी गुरू सुन्न. मन बधिरलेलं. समोर टीपॉयवर डायरी पडलीय. ती उघडून पाहायचा, वाचायचा धीर होत नाहीये. अस्वस्थतेला वाट मिळावी म्हणून एकामागून एक सिगारेट ओढतोय फसाफसा. छाती धुरकटलीय. नाका-तोंडात धुराचा दर्प दाटलाय. पण अस्वस्थता कमी व्हायचं नाव घेत नाहीय. “माफ कर बेबी.' त्याच स्वत:शीच पुटपुटणं. “तुझ्यापुढे मी सिग्रेटा लिमिटमध्ये ओढायचो. तुला मला धाक

१३० । लक्षदीप