पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४.

 लक्ष्मीकांत देशमुख यांचे कादंबरीवाङ्मय हे विविधस्वरूपी आहे. गेल्या दोनएक दशकात त्यांच्या सहा कादंब-या प्रकाशित आहेत.समस्याचित्रण,राजकीय जाणिवा ते आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे चित्रण असे विविध विषय त्यांच्या कादंब-यातून चित्रित झाले आहेत.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सलोमी,अंधेरनगरी, होते कुरूप वेडे,ऑक्टोपस, इन्किलाब विरुद्ध जिहाद आणि हरवलेले बालपण या कादंब-या प्रकाशित आहेत.या कादंब-यांतून विविध प्रकारची आशयसूत्रे व्यक्त झाली आहेत.दीर्घकाळ प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.आपल्या अवतीभोवतीच्या जगातून आपल्या कादंब-यांचे विषय त्यांनी निवडले आहेत.'मी माणसं वाचणारा लेखक आहे' असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे.तद्वत आपल्या दीर्घकाळाच्या प्रशासकीय सेवाकार्यकाळात त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवाधारित या कादंबच्या आहेत.त्यांच्या कादंब-यातून प्रशासनातील व राजकारणातील महत्त्वाच्या जाणिवांचे प्रकटीकरण झाले आहे.
 त्यांच्या या कादंब-यांच्या आशयसूत्रांचे तीन सूत्रात विवरण करता येईल.सलोमी व हरवलेलं बालपण या कादंबच्यातून सामाजिक समस्येचे चित्रण मांडले आहे.ऑक्टोपस व अंधेरनगरी या दोन कादंबच्या समकालीन प्रशासन विषयावरच्या आहेत.तर एक वेगळ्या आणि अनोख्या विषयाची मांडणी करणा-या बृहद कादंबरीत वेगळा विषय ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये मांडला आहे.मराठी कादंबरीत राजकीय जीवनाचे चित्रण फारसे प्रभावीपणे आलेले नाही.वास्तविक पाहता राजकीय जाणिवा ह्या मानवी जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहेत.सामाजिक जीवनातील राजकारणाचे ताणेबाणे,त्यातील सूक्ष्मता कादंबरीत मराठी लेखकांना फारशी आणता आलेली नाही आणि आली तरी ती पृष्ठस्तरावरून कादंबरीचे नेपथ्य वा पार्श्वभूमी म्हणून आलेली आहे.राजकारणाचा खोलवरचा वेध घेणाच्या कादंब-या मराठीत अपवादानेच आढळतात.

 सलोमी आणि दौलत (१९९०) या त्यांच्या दोन लघुकादंब-या. या दोनही कादंब-यांतून देशमुख यांनी वेगळे विषय मांडले आहेत.सलोमी या साठेक पृष्ठांच्या लघुकादंबरीत एका मुस्लीम बंडखोर तरुण स्त्रीच्या वाताहतीची कहाणी सांगितली आहे.मराठीतील लोकप्रिय लेखक बाबा कदम यांची छोटेखानी स्वरूपाची प्रस्तावना या कादबरीस आहे.सलोमीची शोकान्त करुण अशी ही कहाणी आहे.आधुनिक काळातही मुस्लीम स्त्रियांना स्वातंत्र्याचा अवकाश उपलब्ध नाही.स्वत:च्या मनासारखे निर्णय त्यांना घेता येत नाहीत.अशा वेळी त्यांच्या मनाची होणारी पराकोटीची चषणी हा या कादंबरीचा विषय आहे. सलोमीच्या २८ वर्षातील पूर्वकाळातील नोंदी या कादंबरीत आहेत.धर्मांध, रूढी रिवाजांचे चित्रण आहे. तर त्याच काळातील नव्या सामाजिक जागरणाच्या अवकाशाचेही चित्रण तीमध्ये आहे.पितृसत्तेची दहशत आणि

१२ । लक्षदीप