पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुम्ही तर जाणता सर की, आमच्या समाजात तशी लवकरच लग्नं होतात अगदी अल्पवयीन नाही, तरी अठरा वर्ष संपता संपता तरी केली जातातच. त्यामानानं चोवीस वर्षांची मी घोडनवरीच म्हणायला हवी..." गुरूच्या काळजाचा एक ठोका निसटला. त्याला कळेना असं का व्हावं? “पंधरा दिवसांपूर्वी माझा दाखवण्याचा कार्यक्रम झाला. तिकडून पसंती आली आहे.” तुला ते पसंत आहे?" मला आई-बाबांनी विचारलंच कुठं? त्यांनी त्यांना संमती देऊन टाकली आहे. मी परतताच हळदीचा कार्यक्रम आहे. आय मीन, साखरपुड्याचा." बेबीचा स्वर कापते होता, “तुम्ही याल सर त्यासाठी?" । “छट, कदापि नाही." ताडकन तो म्हणाला आणि स्वत:शीच मनोमन तो शरमला. आपली ही टोकाची तीव्र नकाराची प्रतिक्रिया का? त्याला प्रश्न पडला होता. याक्षणी तरी त्याच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं, पण कसाबसा स्वत:ला सावरत म्हणाला. “त्याचं असं आहे बेबी, तुझ्या घरच्यांना ते रुचेल काय? पुन्हा मी पडतो बी. सी., दलित..." “तुम्ही माझे गुरू आहात. इथं जातीचा प्रश्न कुठे येतो?" बेबी भावुक भाबडेपणानं म्हणाली, "केवळ गुरूच नाही तर फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईड आहात. त्याहून जादा अधिक जवळचे आहात. ते कसं? सांगता येत नाही, पण मी मनापासून सांगते सर, तिचा सूर कमालीचा प्रांजळ होता. त्यातली सच्चाई व आर्तता त्याला जाणवत होती... बेबी, मलाही असंच काहीसं वाटतं.. तू - तू माझ्यासाठी ‘स्पेशल' आहेस. तुझा धावण्याचा सराव घेताना मीही तुझ्या सुसाट वेगाशी स्पर्धा करू पाहायचो अन् । त्यात आनंद मिळायचा... तुझ्या समवेत धावताना मन हलकं, तरल असायचं. मी कधी विचार केला नाही. मनाचे व्यवहार खरंच कळत नाहीत. त्यामुळे तुझ्याबद्दल वगळ, काहीतरी खास सच्चं वाटतं. त्याचा अर्थ आजही उमगत नाही. पण, पण कुठतरी तुझा विवाह ठरल्याचं ऐकन धक्का का बसला?" | सर, लग्नाला आणि दाखवून घ्यायला माझी ना नव्हती है खरं, पण एवढ्या ९... हे सारं काही... मला कळत नाही, यामुळे मी खुश आहे की नाही?” “का? तो तुला पसंत नाही?" | तसे काही नाही. त्याचं खानदानी घरणं आहे. दिसायला तसा तो नक्कीच अहि. हाटेलचा व्यवसाय आहे. पण, पण मला तो अपरिचित आहे... मला भीती वाटते.." कसली?" लक्षदीप ॥ १२९