पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "सर, एक तुम्हाला सांगू की नको, कळत नाही, पण मन अस्वस्थ झालंय म्हणून सांगते.' बेबीच्या त्या प्रस्तावनेत गुरूला एक अनिष्ट संकेत जाणवला. त्यामुळे तो म्हणाला, “नको बेबी, आज नको, पुन्हा कधी."
 “प्लीज सर, मला बेचैन होतंय आणि ही बेचैनी कशाची हेही कळत नाहीये. रात्रभर मी झोपू नाही शकणार, म्हणून ‘प्लीज' सर."
 “तसं असल तर ओके.' खांदे उडवीत तो म्हणाला, “तुला आज पुरेशी झोप मिळणं आवश्यक आहे. कारण उद्या फोर बाय फोरची चारशे मीटर्सची रिले दौड आहे. इतर तिघींचा सध्याचा रनिंग टाईम आणि तू आज शंभर मीटरमध्ये नोंदवलेली वेळ पाहता महाराष्ट्राला आणखी एक गोल्ड मेडल मिळणं सहज शक्य आहे. आजच्यापेक्षा एक सेकंद कमी वेग राहिला तरी चालेल. पण नको बेबी. तुला आजचा वेग कायम राखला पाहिजे, नव्हे, वाढवला पाहिजे. आणखी दोन महिन्यांनी ऑलिम्पिक पात्रतेसाठी चाचणी स्पर्धा होईल.... तेव्हा एक ते दीड सेकंद वेळ वाढवली पाहिजे. तर तुला ऑलिम्पिकच्या अंतिम आठ स्पर्धकांत स्थान जरूर मिळेल. पी. टी. उषानंतर तूच है। स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला ठरशील. पण तुला तिच्यापुढं गेलं पाहिजे, पदक मिळवलं पाहिजे."
 “पुरे, पुरे सर. बेबी म्हणाली, “तुम्ही फार मोठी स्वप्नं पाहता. मला, मला भीती वाटते सर. आणि प्रश्न पडतो सर की, मी ती पुरी करण्याइतपत सक्षम आहे का?"
 “एस, डेफिनेटली बेबी. यू आर माय फाइण्ड अॅण्ड क्रिएशन. हे मी नाही, तूच नेहमी म्हणतेस ना? मनापासून? खरंखुरं?"
 "होय सर."
 मग माझा माझ्या क्रिएशन्सच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. यू कॅन विन, नो, यू विल बिन."
 "ओ.के. ओ. के. सर आय प्रॉमिस यू...."
 तिनं त्याच्या हातावर आपले हात ठेवीत म्हटलं... पण त्यात नेहमीचा जा आणि आश्वासकता नव्हती. ती म्हणाली, “घरी साताव्याला फोन केला आई बाबाना. तेव्हा त्यांनी माझ्या यशाबद्दल अभिनंदन करताना त्यांच्या मते एक आनंदाची बातमी दिली...."
 "अच्छा... मी पण त्या आनंदात सामील होईन की."
 “सर, आय अॅम कन्फ्युज्ड.... माझ्या मनाचा गोंधळ उडालाय. मला हे हवं हात की नाही कळत नाहीये. आज काहीतरी वेगळंच होतंय."बेबी म्हणाली, “पण तुम्हाला सांगितल्यानंतर मन तरी शांत होईल. म्हणून..."

 “शुअर, बोल ना!”

१२८ ॥ लक्षदीप