पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "असं का म्हणतोस हॅम. अजूनही संधी आहे. वय पण आहे."
 कशाला खोटं बोलत मला धीर द्यायचा प्रयत्न करतोस? आय कॅन रीड द रायटिंग ऑन द वॉल क्लिअरली.” कडवट हसत हॅम म्हणाला. ते ऐकताना निलूच्या अंगावर सर्रकन काटा आला. ते हास्य नव्हतं, हसरं रुदन होतं.
 "हॅम, काय बोलावं कळत नाही. मी आता तुझ्याकडे येतो. समक्ष बोलूयात.”
 "नो कॅप्टन, नो. आज मला तुला भेटायचं नाही." हॅम घाईघाईनं म्हणाला, पराभूत कर्णाला सदैव विजयी असणा-या अर्जुनानं भेटायचं नसतं. ती भेट कर्णासाठी अधिक वेदनादायी असते."
 "प्लीज हॅम, प्लीज.... आपण शाळेत मराठीच्या मॅडममुळे कर्णावरील कादंब-या वाचल्या आहेत; पण आज स्वत:ला तू कर्ण म्हणवून घेणं मला नाही सहन होत मित्रा, स्वत:ची शरम वाटते. आणि मी रे कसला अर्जुन? आणि माझ्याइतकीच, नव्हे काकणभर सरस अशी, तुझी कामगिरी सुरुवातीला होती. या पाच-सहा वर्षात तू खराब खेळूनही तुझी टेस्ट व वनडेची सरासरी एवढीच जवळपास आहे.”
 "माझं जाऊ दे. तू खरंच अर्जुन आहेस. मॅच विनर', हॅम म्हणाला. “आणि तू अभेद्य, अजिंक्य आहेस. कारण तुझ्यामागं तुझा कृष्ण उभा आहे.”
 "व्हाट डू यू मीन? मला कोणी गॉडफादर नाही, हे तू जाणतोस.”
 "मी त्या अर्थानं नाही म्हणालो सॅम. तुझा कृष्ण म्हणजे तुझी जात. उच्च जात वर्ण. तो अदृश्य कृष्ण या दलिताचा सारथी कसा होणार?”
 “यू आर टॉकिंग नॉन्सेन्स यार. इथं जातीचा प्रश्न येतोच कुठं?"
 "तुझा प्रश्नच नाही. तुझी निवड वादातीतच होती व आहे."
 हॅम पुन्हा तसाच कडवट हसत म्हणाला, “पण माझ्यानंतर संघात आलेले. राहुल काय, सौरभ काय, दोघांना किती वेळा सलगपणे संधी दिली गेली? त्यांचा सातत्यानं खेळ खराब व अप टू द मार्क नसूनही? त्या पाश्र्वभूमीवर माझ्या प्रत्येक कम बॅकला एक वा दोन सामने झाल्यावर खराब खेळ केला म्हणून मला वगळलं, पण ते कायम राहिले व आज संघात पक्के झाले... माझ्या बाबतीत असं का घडलं नाही? यू हॅव एनी अन्सर?"

 निलूला हॅमची ही खंत माहीत होती आणि तिलाही ते पटायचं. त्याचे मदानाबाहेरचे चित्रविचित्र चाळे व स्वैर वागणं यावर जेवढी कठोर व प्रसंगी जहरी दाका माडियात व्हायची, तेवढी ती कधी अझहर वा सौरभच्या अफेअरची होत नाही. हमला वगळताना खराब फॉर्मसोबत बेशिस्त वागणं हे जे कारण निवड-समितीकडून ६ जायचे, त्या समितीला इतरांचं असंच वागणं कधी का खुपत नव्हतं? या प्रश्नाचं नलाही उत्तर सापडत नव्हतं. आज हाच प्रश्न हॅमनं संघाचा कॅप्टन सॅमला केला होता आणि त्याचं उत्तर ऐकायला तीही उत्सुक होती.

लक्षदीप ११७