पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "ठीक आहे पण आज तुला गाणं ऐकायचंय ना? मग ऐक, पण प्लीज ते ऐकताना तू डोळ्यांतून पाणी नाही काढायचं. मला मात्र त्या निमित्तानं साच्या पराभवाचा, हताशतेचा निचरा डोळ्यांतून अवघे आसू वाहून करायचा आहे."
 "हॅम -..."
 “नो-नो निलू," तो एक जुनं दर्दभरं गाणं उत्कटतेनं गाऊ लागला. आणि हॅमनं पुन्हा गाणं म्हणायला सुरुवात केली.
 "भूली हुवी यादों, मुझे इतना ना सताओ.
 अब चैनसे रहने दो, मेरे पास न आओ..."
 त्याचा खर्जातला आवाज थरथरत होता आणि बाहेरच्या मुंबईच्या पावसाशी स्पर्धा करीत त्याचे डोळे बरसत होते.
 निलूला त्या आवाजातून प्रकटणारी तीव्र निराशा, वेदना आणि पराभूतता असह्य होत होती. आत खोलवर साचलेल्या भावनांचा तो उद्रेक, ज्वालामुखीच्या लाव्हारसाप्रमाणे भाजून काढत होता; पण ती त्याला रोकणार नव्हती. फक्त उद्रेक शमण्याची, थांबण्याची वाट पाहात होती आणि ती वाट प्रदीर्घ वाट होती, एवढंच तिला जाणवत होतं. केव्हा व कधी तिच्या डोळ्यांतली आसवं त्याला मिठीत घेऊन त्याच्या आसवात मिसळून गंगा-यमुनेच्या संगमाप्रमाणे एकरूप होऊन वाहू लागली, तिला कळलंच नाही.
 ते दोघं परस्परांच्या मिठीमधून अलग होत भानावर आले ते टेलिफोनच्या बेलनं. आपले डोळे पुशीत हॅम म्हणाला, "नक्कीच सॅमचा फोन असणार." त्यानं रिसिव्हर उचलत म्हटलं - ‘हॅलो.'
 निलूनंही स्वत:ला एव्हाना सावरलं होतं. ती ऐकत होती. कॉर्डलेस यंत्राचं बटन दाबून सॅम व हॅमचं संभाषण, ‘सॉरी फ्रेण्ड, अॅज ए कॅप्टन, मी निवड समितीला बरंच प्रेस केलं, तुला एक चान्स द्यावा म्हणून. मला टीममध्ये मधल्या फळीत माझ्याप्रमाणे पूर्ण मैदानावर फटके मारीत वेगानं धावा करणारा आक्रमक फलंदाज हवा होती; पणपण तुझा रणजी व दिलीपचा खराब परफॉर्मन्स तुझ्या निवडीआड आला."
 तो मनापासून व तळमळीनं बोलत होता. हे हॅमप्रमाणे निलूलाही जाणवलं.

 जाने दो सँम... ये न थी हमारी किस्मत... दुसरं काय? सुनील सरांच्या जमान्यातल्या मोहिंदर अमरनाथप्रमाणे मीही चारवेळा इंडियन टीममध्ये कम बॅक केलं; पण पुरेशी संधी कधी दिलीच नाही मला सेटल व्हायची. प्रत्येक वेळी मोठा गॅप, त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमनाच्या वेळी खेळताना दडपण जाणवायचं की, आपण यावेळी क्लिक झालो नाही तर पुढच्या सामन्यात वगळले जाऊ... त्यामुळे लेला फॉर्म गवसण्यापूर्वीच व सेटल होण्यापूर्वीच वगळला जायचो... खैर, नाऊ ६ चाप्टर इज ओव्हर. आता आपण एकत्र कधीच खेळणार नाही सॅम...”

११६ । लक्षदीप