पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सॅम...!" हॅम आवेगानं थरथरत म्हणाला, “आमच्यात फार अंतर पडलंय! ही ईज अॅट द टॉप ऑफ द वर्ल्ड आणि मी पराभूत खाईत गाडला जातोय लोकांच्या विस्मृतीच्या, कारण इंडियन मॉब वर्शिप करतो तो फक्त शायनिंग स्टारची. आय वाज फेडिंग ग्रॅज्युअली आणि आज तर पूर्णत: फेड आऊट झालो आहे मी. मी सॅम सोबत पुन्हा कधीच खेळू शकणार नाही. आमची जगभर मशहूर असलेली क्रिकेटमधील जोडी संपुष्टात आली आहे, आणि वेडे, तू मला त्या फ्रेण्डशिपच्या गाण्याची याद देऊन टोचण्या देतेस?"
 “असं का म्हणतोस हॅम? तुझी व सॅमभय्याची मैत्री तर तुमच्या चड्डीतल्या दिवसांपासूनची - क्रिकेटच्या पलीकडची ना?"
 “निलू, तुला कधीच कळायचं नाही ते. अगदी मुंबईतही एका दलिताशी उच्चवर्गीय निर्मळ दोस्ती नाही ठेवू शकत, सॅम त्याला ब-याच अंशी अपवाद ठरला. पण तोही माझ्या, त्याच्या क्रिकेटच्या समान धाग्यामुळे व आमचे खरे गुरू आचरेकर सरांमुळे."
 "व्हॉट यू मीन हॅम, मला कळणार नाही, असं का म्हणतोस?"
 "व्हेरी प्लेन अॅण्ड सिंपल! अगं, तुझं घराणं ब्रिटिश आमदानीपासून धर्मांतरित असल्यामुळे व मागील तीन पिढ्या लष्करात कॅप्टन व कर्नल अशा हुद्यावर तुझे वडील असल्यामुळे आधीं अँग्लो इंडियन व मग मेट्रोपोलिटन - कॉस्मोपॉलिटन कल्चरमध्ये तू वाढलीस, मोठी झालीस. तुला समाजात मिसळण्यात कधी जातीचा अडसर निर्माण झाला नाही, म्हणून म्हटलं मी. माझे तसं नाही. माझा रंग आणि माझी झोपड़पट्टी जगाला माझी जात विसरू देत नाही. तरीही सॅमची निर्भेळ मैत्री मिळाली, हे भाग्यच म्हटलं पाहिजे."
 “बरं, ते जाऊ दे. प्लीज सिंग फॉर मी. आय वाँट टू हिअर देंट साँग फ्रॉम चीअर अप कॅसेट..."
 त्यानं आपला गळा खाकरला आणि गुणगुणू लागला.
 रूक जाना नहीं, तू कही हार के
 काटों पे चलते, मिलेंगे साये बहार के,
 ओ राही, ओ राही..."
 आणि त्याच्या नकळत हॅमच्या ओठांतून एक हुंदका निसटला. निलू अवाक् होऊन पाहात राहिली. आता तिची पाळी होती त्याचे सांत्वन करण्याची व त्याच्या : डोळ्यांतले पाणी टिपण्याची.
 मी - मी पराभूत झालोय. थांबला गेलो आहे, तर मग कसं म्हणू - रुक जाना नही."

 "आय अॅम सॉरी. मला वाटलं होतं..."

लक्षदीप । ११५