पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाईज..."
 “काय करशील? मला मारशीलच ना?” तिची धुंदीतली बेभान अवस्था अजूनही ओसरली नव्हती. त्यामुळे त्याच्या आक्रमक धमकीला तेवढ्याच आक्रमकतेनं उत्तर देत हिस्टेरिक झाल्याप्रमाणे ती किंचाळत म्हणाली, “मार - मार. तिथं मैदानात बॅटनं सॅमभय्याप्रमाणे चेंडू ताकदीनं मारता येत नाही. मागच्या मोसमातील तुझ्या कमबॅक मॅचमध्ये पाहिलं ना! तुझ्यापेक्षा मुंबई तर सोडून दे, पण गुजरात- मध्यप्रदेशचा रणजी प्लेअर पण बरा खेळला असता! यू आर फिनिश्ड माय डिअर, फिनिश्ड.... मघाशी तुझे सो कॉल्ड मेंटॉर अॅण्ड गॉडफादर काय म्हणाले ऐकलंस ना? यू आर नॉट कन्सिडर्ड अॅट ऑल, यू, यू हॅव नो चान्स टू कम बँक..." आणि थकून । गेल्याप्रमाणे कोचावर तिनं बसकण मारली आणि क्षणभरानं म्हणाली, “हॅम, काय झालं रे हे? आय जस्ट कांट डायजस्ट धिस न्यूज.... आणि त्याच्या गळ्याला मिठी मारून ती मोठ्यानं आवाज करीत स्फुटू लागली. हॅम तिची पाठ थोपटीत ‘निलू निलू असं पुटपुटत तिला सांत्वना देत होता आणि डाव्या हातानं आपल्या डोळ्यात जमा होणारं पाणी पुसत होता!
 “निलू - निलू डार्लिंग .. शांत हो. नाकारलेपण अगं कर्णाला जिथं चुकलं नाही, तिथं मी कोण? भारतात दलिताला पराक्रमापेक्षा नियतीवरच जादा भरवसा ठेवावा लागतो. प्लीज शांत हो!”
 “आय अॅम रियली अपसेट हॅम. असं वाटतंय, तू नाही, मीच पराभूत झालेय....” निलु पुटपुटली. “मागच्या वर्ल्डकपच्या वेळी भारतीय संघाला चीअरअप करण्यासाठी संजय मांजरेकर, अनिल कुंबळे अशा खेळाडूंसोबत तूही गाणं गायल होतंस ना त्या कॅसेटमध्ये. ते गाणं म्हण विनोद, आय मीन हॅम...."
 “किती दिवसांनी मला मूळ नावानं साद दिलीस! ती ऐकायला बरं वाटलं बघ! हॅम म्हणाला, “म्हणून सहजतेनं ओठावर तुझं मूळचं ख्रिश्चन नाव आलं. बापासाठी मी तुझं निलू असं नामकरण केलं आणि ओठात तेच रुजलं गेलं!"
 “लग्नानंतर तुम्हा हिंदूंची बायकोचं नाव बदलायची परंपरा मला कधीच पसंत नव्हती, पण खैर....” निलू जुन्या जमान्यात स्मृतीनं जात म्हणाली, “नाव का फक्त मुलीचं बदलायचं? मुलाचं का नाही? असं मी कॉलेजमध्ये डिबेटिंगमध्ये मुद्दा मांडून युनिव्हर्सिटी विनर ठरले होते. त्यामुळं जसं तू मला निलू केलंस मी तुला आधी ह्यूम केलं. विनोद म्हणजे ह्युमर... म्हणून ह्यूम! पण तुझा बालमित्र सचिनला तू सम म्हणायचास, म्हणून त्याला पॅरलल असं हॅम म्हणायला मी सुरुवात केली. सॅमभय्यालाही ते आवडलं. तो व तू एकत्र असला की व तुमच्या मैत्रीचा संदर्भ काढला की न चुकता त मनापासून गायचास... सात अजुबे इस दुनियामें आठवी अपनी जोडी..."

 “नो निलू, प्लीज. डोंट रिमाइंड मी देंट साँग ऑफ माय फ्रेण्डशिप वुइथ

११४ । लक्षदीप