पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उदास व्हायचा, दुखावला जायचा. आणि त्यावर मात करावी म्हणून अशावेळी निलूच्या संदर्भात तिच्या प्रेम व समर्पणानं तिच्या प्रती सदैव ऋणी आणि कृतज्ञ असणारा हॅम अकारण आक्रमक व्हायचा आणि तिला लागट बोलायचा. आजही तसंच झालं.
 आधीच बेबंद कोसळणारा पाऊस पाहताना त्याला झोपडपट्टीचे ते अभावाचे आणि खेडेगावच्या गावकुसाबाहेरचे जगण्याचे सदृश्य जीवन आठवण देत जगणे उदास करीत होतं. आणि त्या जीवनावर ज्या क्रिकेटमुळं मात करीत जुहू बीच कॉलनीत खिडकीतून समुद्र दिसणा-या आलिशान फ्लॅटच्या उच्चभ्रू जीवनापर्यंत वाटचाल केली, त्या क्रिकेटची कवचकुंडलंही गळून पडली होती, पण कर्णाप्रमाणे त्याला त्याविना लढता पण येत नव्हतं. कारण लढण्यासाठी त्याला युद्धभूमीच मुळी नाकारण्यात आली होती. त्याला सतत टीममधून वगळलं जात होतं. ही कदाचित शेवटची संधी होती. आगामी दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज दौ-यासाठी जाणाच्या संघात त्याला निवडण्यात आलं नव्हतं. मघाशी टेनिस मॅचपूर्वी लागलेल्या बातम्यात संघ निवडीची बातमी होती. त्याच्याप्रमाणे धर्मांतरित ख्रिश्चन दलित असलेले आणि म्हणूनच ज्यांच्याबद्दल त्याला आपलेपणा वाटायचा, त्या त्याचा फ्रेण्ड, फिलॉसॉफर अॅण्ड गाईड असणा-या निवड समितीच्या अध्यक्षांनी प्रेस ब्रीफिंग करताना एका पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना शेवटचा घाव घातला होता. “नो, हीं इज नॉट कंसिंडर्ड अॅट ऑल. आय डोंट थिंक, ही हॅज एनी चान्स टू कम बँक...."
 निवडलेल्या संघात अर्थातच सॅम होता. त्याच्या शारदाश्रम शाळेचा मित्र आणि सहाध्यायी. तो जसा खेळू लागला. तसा पहिल्या मॅचपासून भारतीय संघाचा अविभाज्य भाग होता. मॅच विनर आणि रन मशीन असं त्याला म्हटलं जायचं. शेन वार्ननं तर त्याला 'इंडियाज लिव्हिंग गॉड' असं संबोधलं होतं. त्या सॅमची मागील सामन्यामधील क्षणचित्रं बातम्यांसोबत दाखवली जात होती. हॅमला त्याच्या निवडीची खात्री होती व आपण वगळले गेलो हे कळूनही नेहमीप्रमाणे सॅमबद्दल त्याला निर्मळ आनंद झाला होता!

 मघाशी निलूनं विल्यम भगिनींचा ‘प्युअर ब्लॅक डायमंड' असा उल्लेख मॅच पाहताना सहज केला आणि हॅमची मद्याची आणि तिच्या ब-याच दिवसांनी मिळणाच्या उदार व लोभस सहवासाची धुंदी खाडकन उतरली. त्याचं मन ठसठसू लागलं.रिधातून एक हताशता आणि पराकोटीचं नैराश्य विद्युत वेगानं स्रवू लागलं! आणि मान होत निलूनं प्रकट केलेली त्याची वेदना आणि क्रिकेट जगतानं आता आपल्यास त: नाकारल्याची जाणीव त्याला शोकसंतप्त करून गेली. तीव्र न्यूनगंडाचा भाव दडपून टाकण्यासाठी त्यानं परंपरागत पुरुषी आक्रमकतेचा सहारा घेतला आणि तो कडाडला. 'इटस् इनफ निलू - इनफ! नॉट ए सिंगल वर्ड यू विल अटर मोर, अदर

लक्षदीप । ११३