पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठरवलं. मंजुळा थोडी साशंक होती, पण वकीलसाहेब म्हणाले, “ही फार आगळावेगळी केस ठरणार आहे. त्याबाबत कोणाचा प्रिसिडन्स नाही. आणि आपली सर्वोच्च न्यायसंस्था धाडसी व कमालीची प्रो-अॅक्टिव्ह आहे. आपण जरूर चान्स घेऊ या."
 “बँक्स अ लॉट." मंजुळा म्हणाली, “मी उद्याच जाऊन परत मीनाला भेटते, आणि मग आपण येत्या सोमवारी केस दाखल करू या!"
 मंजुळा दुस-या दिवशी पाथरुडला पोहोचली आणि पाहते तर काय, पुन्हा मीना आय. सी. यू मध्ये. तिनं पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण पुन्हा ती वाचली होती.
 मीनानं मंजुळाभाभीला पाहिलं, तेव्हा तिची नजर खाली झुकली गेली. ‘आय अॅम सॉरी, पण, पण....."
 "असं काय घडलं पोरी? इथे मी तातडीनं आली आहे, ते तुला खूशखबर द्यायला की, आपण केस जिंकू शकतो. त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. हे तुला सांगायला मी इथं आलो; पण...."
 "मी सॉरी म्हणलंय ना. पण, मी तरी काय करू? मजबूर होते."
 मला नाही सांगणार काय झालं पुन्हा असं की, तुला दुस-यांदा आत्महत्या करावी वाटली?"
 मीनाचे ओठ थरथरत होते. काही नाजूक भावनिक असं सांगायचं होतं. पण कसं सांगावं हे उमगत नव्हतं. तरीही थोड्या वेळानं हिंमत धरून तुटकमुटक शब्दात धीर एकवटून तिनं घड़लेलं सारं काही सांगून टाकलं.
 मीनाच्या भेटीला तिची गेल्या दोन वर्षांतील खेळाडू मैत्रीण तनू आली होती. ती मीनाची सदैव रूम पार्टनर असायची, पण गेल्या एक वर्षापासून मीनानं रूम पार्टनर बदलली होती. मग ती सानियाची पार्टनर झाली होती. तिच्याकडून सानियाला मीनाबद्दलचं एक नाजूक गुपित कळालं होतं. मग त्याचा फायदा घेऊन पाहिल्या आत्महत्येतून वाचलेल्या मीनावर पुन्हा घाव घालून तिला कायमचं खेळातून पार करावं, म्हणजे आपली बदनामी होणार नाही. समाज आपल्याला खलनायिका ठरवणार नाही? या आंधळ्या प्रेरणेनं सानियानं तनूस भरीस घातलं. त्यासाठी तिच्या सर्व आर्थिक गरजा पुरवल्या.
 तनू मीनाला भेटल्यावर म्हणाली, “तू मला झिडकारलंस. पण आय स्टील लव्ह यु, मला आजही तूच लाईफ पार्टनर म्हणून हवी आहेस. वई आर रिअली ए गुड कपल. तू माझ्यासाठी मर्द आहेस, मर्दसिंग! आपल्याला रिलेशनमध्ये तू नवरा व मी बायको आहे. मला अजूनही तू हवी आहेस."

 मीना हादरली, स्तंभित झाली. तनू बोलत होती ते काही खोटं नव्हतं. किशोर तिच्या जीवनातून निघून गेल्यानंतर देशात विविध स्पर्धात खेळताना टीम मेंबर म्हणून

१०८ ॥ लक्षदीप