पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अॅण्ड्रोजन इन-सेन्सिटिव्हिटी सिंड्रोम (सी. ए. आय. एस) ची स्त्री लैंगिक सुखही अनुभवू शकते. फक्त पाळी नसल्यामुळे ती आई होऊ शकत नाही एवढेच.”
 "ते ठीक आहे वकीलसाहेब, पण क्लिनिकली व जेनेटिकली मीनाला पुरुष मानलं गेलं दोह्याला मेडिकल टेस्टद्वारे. त्याच्या विरुद्ध काय युक्तिवाद आहे आपल्याकडं?"
 “खरं तर, याचा फैसला इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशननं ऑलरेडी केला आहे. जेंडर टेस्ट या १०० टक्के विश्वसनीय नाहीत म्हणून, खासकरून सीएआयएस महिलांबाबत.”
 “त्याचं कारण?"
 “अॅण्ड्रोजन हार्मोन स्वीकारणारं रिसेप्टर नसणं, हे होय! ते नसल्यामुळे कितीही स्टिरॉईड घ्या, अशा स्त्रियात मस्क्युनिलिटी कधीच डेव्हलप होणार नाही. त्यामुळे अशा एक्स वाय गुणसूत्र असणा-या पण अॅण्ड्रोजन हार्मोन स्वीकारणारं रिसेप्टर नसलेल्या स्त्रियांमध्ये पुरुषी जननेंद्रियं विकसित होत नाहीत, पुन्हा इतर स्त्रीच्या तुलनेत सी. एस. आय. एस. स्त्रीमध्ये जादा ताकद वा इतर पुरुषी गुण असतात, असं आजवर निर्विवादपणे सिद्ध झालेलं नाही. अशा स्त्रियांना इतरांच्या संदर्भात कोणताही फायदा खेळात होत नाही." डॉक्टरांनी शक्य तितक्या सोप्या भाषेत स्पष्ट करायचा प्रयत्न केला.
 विद्या मूळची डॉक्टर होती. मीनाची केस काही शेकड्यात एक अशी होती. तिच्या लक्षात सारं काही आलं होतं. मीनाची प्रकृती आणि वृत्ती स्त्रीत्वाकडे बहुतांश झुकलेली, पण पुरुषी गुणसूत्रामुळे तांत्रिकदृष्ट्या तिला पुरुष ठरवून दोह्याचा मेडिकल टीमनं पुढील शर्यतीत खेळण्यासाठी त्यांच्या नियमामुळे अपात्र केलं होतं.
 “मंजुळा, आपल्याला फायटिंग चान्स आहे. अॅण्ड्रोजन हार्मोन हे जीवाला पुरुषी रूप देतं. केवळ एक्स आणि वाय क्रोमोझोम असणं पुरेसं नाही पुरुषासाठी. मीनामध्ये अॅण्ड्रोजन सद्वीकारणारं रिसेप्टर नाही. त्यामुळे तिच्या शरीराला मस्क्युलाईन टच नाही. कितीही शक्तिशाली स्टिरॉईड घेतली तरी अॅण्ड्रोजन स्वीकारणाच्या रिसेप्टरअभावी तिचे मसल पुरुषाप्रमाणे डेव्हलप होणं शक्य नाही. त्यामुळे मीनाला कोणत्याही कम्पॅरिटिव्ह अॅडव्हांटेज एक्स-वाय क्रोमोझोनमुळे खेळताना - पळताना मिळत नाही. हे तर्कशुद्ध रीतीनं कोर्टात मांडलं तर आपल्याला जिंकायची चांगली संधी आहे.”
 “आणखी एक ट्रम्प कार्ड आहे आपल्याजवळ. जेव्हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना लिंगनिदान चाचणी पूर्णपणे विश्वासार्ह मानत नाही आणि ती बंद करते, तेव्हा तिचा एक भाग असलेली आशियाई संघटना ती लिंगनिदान चाचणी कशी चाल ठवते? त्या नावाखाली एका खेळाडूचं अस्तित्व उध्वस्त करण्याचा निर्णय कसा घेते? हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरू शकतो."

 चौघांनी एकमतानं थेट सुप्रीम कोर्टात जनहितार्थ याचिका दाखल करण्याचं

लक्षदीप ॥ १०७