पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मीनाचं कोरडं कौतुक रौप्य पदक मिळाल्याबद्दल केलं आणि आपल्या रूममध्ये येऊन स्वत:ला कोंडून घेतलं.
 त्या दुपारी मॅनेजरनं तिला एक टीप दिली, “हे पाहा सानिया, तुला उद्या खेळायचं असेल तर मीनाला बाद... अनफिट ठरवलं पाहिजे."
 "पण, ते कसं शक्य आहे सर?" काहीशा अविश्वासानं, तिनं विचारलं.
 "मीनाच्या लिंगचाचणीची, आय मीन, जेंडर टेस्टची मागणी करून."
 ""ही काय भानगड आहे.”
 त्यानं लिंगनिदान चाचणीचा थोडा इतिहास सांगितला.
 "बेबी, १९६० च्या शतकात काही पुरुष खेळाडूंनी स्त्रीवेष धारण करून स्त्री म्हणून स्पर्धा जिंकल्याच्या काही घटना उघडकीस आल्या. म्हणून लिंगचाचणी परीक्षा सुरू केली. यू नो, तू सायन्सची विद्यार्थिनी आहेस. तुला हे माहीत असेलच की, स्त्रीमध्ये दोन एक्स क्रोमोझोम असतात, तर पुरुषात एक एक्स व एक वाय क्रोमोझोम असतो, पण काही स्त्रियांमध्ये पुरुषाप्रमाणे एक्स - वाय क्रोमोझोम्सची जोडी असते. तरी बाह्यरूप स्त्रीचं विकसित होतं. असंच काही मीनाचं असावं, तू जेंडर टेस्टची मागणी कर. ती जर त्यात फेल झाली तर तुला उद्या १५०० मीटरच्या शर्यतीती उतरता येईल. यू हॅव - गुड चान्स टू विन मेडल!"
 “पण, इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशननं अशा चाचण्या फुलफ नसल्यामुळे बंदी घातली ना?"
 “येस, पण आशियाई ऑलिम्पिक असोसिएशननं घातली नाहीय. त्याचा तू फायदा येऊ शकतेस."
 "पण - पण सर, मी - मी व्हिलन ठरेन...!” सानिया थोडी भीत होती.
 "चॉईस इज युवर्स, बेबी."
 सानियानं तासभर विचार केला आणि खलनायिका होण्याचा धोका पत्करून पदक जिंकण्याच्या लालसेनं रीतसर तक्रारवजा संशय नोंदवून लिंगनिदान चाचणीची मागणी केली.
 मीनाला मेडिकल टीमच्या प्रमुखानं तपासणीनंतर बोलावून स्पष्ट सांगितलं, “हे। बेबी, तू जेंडर टेस्ट हरलीस, तू फिमेल नाहीस, मेल आहेस.”
 “पण - पण हे कसं शक्य आहे सर?' मीनानं धाडस करून लज्जेची मर्यादा ओलांडत एक मनोमन जमलेलं गुपित उघड केलं. “मी - मी माझ्या बॉय फ्रेंडसोबत सेक्सचा अनुभव घेतला आहे. स्त्री म्हणून तो मी एंजॉय पण केला आहे. बिलीव्ह मी सर, मी खरीखुरी स्त्री आहे. सेंट परसेंट फिमेल."

 पण तिची विनवणी अरण्यरुदन ठरलं. त्यांनी तातडीनं भारतीय व्यवस्थापकास बोलावून लिंगनिदान चाचणीचा निकाल सांगितला, “शी कांट प्ले टुमारे इन १५००

१०४ ॥ लक्षदीप