पान:लंकादर्शनम्.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७८

हिंदुस्थानांतच होते. सीलोन मधील चांगले मोठाले वेलदोडे आम्हीं खाऊन पाहिले पण त्यांना शिरसीच्या वेलदोड्या सारखा स्वाद नव्हता. तेथे स्वादिष्ट वेलदोडे फारसे होत नाहींत असे आम्हांस कांही लोकांनी सांगितले. वेलदोड्याचे झाड सरासरी ३।४ फूट उंच होते. पाने लांब (केतकी प्रमाणे) असतात व झाडाला पांढरी घोंसदार फुले येतात. फुलांनां वास असत नाहीं.

 हिंदुस्थानांत पुष्कळ ठिकाणी वेलदोड्याची लागवड वाढविणे शक्य आहे व एखादी मोठी कंपनी काढून चीन, जपान, आफ्रिका व अमेरिका इत्यादि राष्ट्रांत खप वाढवून पुष्कळ नफा मिळविणेही शक्य आहे.



पामयरा ताड

 हें ताडाच्या जातीचे झाड आहे व याची लागवड उत्तरेकडील प्रदेशांत म्हणजे जाफनाकडे विशेष आहे. कांहीं झाडांना पुष्कळच पाने असतात तर काहींना फक्त शेंड्याला पानांचा गुच्छ असतो.

 पानांचा उपयोग घरें शेकारण्याकरितां होतो, तसेच त्या पासून चटवा टोपल्या, छत्र्या, पंखे करितात. पानांचे खतही चांगले होते. या ताडपत्रांचा लेखनाचे कामीही उपयोग होतो.

 याला मोठाली व स्वादिष्ट फळे येतात. फळे पिकली म्हणजे जंगलांतून रानटी हत्ती जाफनाकडे येतात कारण हत्तींनां ही फळे फार आवडतात. फळांतील बियांचा उपयोग कढीकरितां होतो, तसेच त्यांचे पीठ करूनही खाता येते. फळांतील रसापासून ताडी व एक प्रकारचा गूळ करितात.

 तामील लोक याचे ८०१ प्रकारचे उपयोग आहेत असे म्हणून त्याची स्तुति करितात तर हिंदुलोक त्यास कल्पवृक्ष मानतात. याचे लाकूड फार कठीण असते व खुर्च्या, कपाटे, इत्यादि सामान करण्यास उपयोगी पडते. तामील लोक असे म्हणतात की हे झाड लावल्याबर एक लक्ष