पान:लंकादर्शनम्.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७७

रंग नारिंगी असतो. फळांत सुमारे ३०।३५ बिया असतात. फळे वेचल्यावर ती पानाखाली थोडी अंबावितात नंतर स्वच्छ धुवून उन्हात वाळवितात. पुढे फळे फोडून कोकोच्या बिया इंग्लंडांत पाठवितात. बिया पासून एक प्रकारचे स्वादिष्ट तेल निघते त्यास ‘कोको बटर' कोकोचे लोणी असे म्हणतात. ते तोंडांत चटकन् विरघळते. कोकाची पूड चाकोलेट करण्याकरितां उपयोगांत आणितात. मलबारमध्ये व निलगिरीवर कोकोची लागवड केलेली आहे परंतु हिंदुस्थानांत हे झाड चांगले वाढत नाहीं.




वेलदोडे

 वेलदोड्याचे पीक हिंदुस्थानांतील उत्तर कारवार, मलबार, कुर्ग निलगिरीवर कुन्नुरच्या जवळील टेकट्यांतल खोरी, ह्मैसार प्रांतांत हसन तालुक्यांतील कांहीं भाग, सीलोन व ब्रह्महेश येथे होते. या पिकास सर्दजमीन व थंड हवा पाहिजे असते. तसेच दऱ्यांमधील निवाऱ्याची जागा पिकास चांगली मानवते.

 वेलदोड्याच्या दोन जाती आहेत. मलबारी जातीचा वेलदोडा लहान असतो, म्हैसुरी जातीचा मोठा असतो. मुळांचे तुकडे लावून नवीन रोपें करितात. कधी कधी ८ फूट लांब व ४ फूट रुंद अशा वाफ्यांत २ तोळे बी पेरून रोपे करितात व या वाक्यांतील रोपे १ एकरास पुरे होतात. रोपे कायम जागी लावण्यापूर्वी दोन वेळा त्यांचे स्थलांतर करावें लागते. दर एकरी सुमारे ४०० झाडे लागतात. झाडाच्या बुंधाशीं फुले येऊन वेलदोडे लागतात. ते एकदम सर्व तयार होत नाहींत. सर्व पीक निघण्यास सुमारे ३ महिने लागतात, एक एकरी १५० ते २५० पौंड उत्पन्न होते.

 सीलोनमध्ये ६००० एकर जमीनीत वेलदोडे होतात व ते हिंदुस्थानांत येतात व खपतात. हिंदुस्थानांतील माल पुष्कळसा बेल्जम, फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका इकडे जातो. वेलदोड्यांचा खप सर्वांत जास्त फक्त