पान:लंकादर्शनम्.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७६

घेर सुमारे ८|१० फूट असतो. हे झाड वाढण्यास व उत्तम प्रतीची दालचिनी तयार होण्यास रेताड जमीन लागते.

 पाश्चात्य लोक पूर्वेकडे आल्यावर त्यांचे लक्ष्य दालचिनीकडे गेलें व दालचिनीचा व्यापार आपल्या ताब्यांत राखण्याकरितां व ज्या प्रदेशांत दालचिनी पिकते तो प्रदेश ताब्यांत ठेवण्याकरिता त्यांनी आटोकाट प्रयत्न केले एवढेच नव्हे तर अनेक युद्धेही केली. डच लोकांनी हा व्यापार अनेक दिवस आपल्या ताब्यांत ठेविला व व्यापारांत मक्तेबाजी करून अचाट संपत्ति मिळविली. जर एखाद्या माणसाने झाडाची फांदी तोडली तर त्या माणसाचा हात तोडून टाकीत, प्रसंग विशेषीं या पेक्षांही कडक शिक्षा होई. डच लोक झाडांची काळजी फारच घेत असत.

 सीलोन खेरीज दुसऱ्या फारच थोड्या ठिकाणी दालचिनी पिकते. आजपर्यंत सीलोनच्या तोडीची दालचिनी पिकविण्याचा प्रयत्न झाला पण त्यांत फारसे यश अद्याप तरी आलेले नाहीं. झाडे मोठी झाली म्हणजे त्यांच्या फांद्या तोडून साल काढितात. सालीवरील निरुपयोगी भाग खरडून ती वाळवितात व बाजारांत विकावयास पाठवितात.

 क्वासिया नांवाचे झाड दालचिनीच्या वर्गातीलच आहे व या झाडाची साल दालचिनींत भेसळ म्हणून घालतात. क्वासियाची भेसळ केली आहे की काय हें आयोडीच्या साह्याने समजते. खरोखर पाहिले तर सध्या जगाला जितकी दालचिनी लागते तितकी ती पिकत नाहीं परन्तु वर सांगितलेल्या भेसळीमुळे पुरवठा कमी आहे ही गोष्ट सहजासहजी समजून येत नाहीं.



कोको

 कोकोचे झाड चहाचे झाडापेक्षा जास्त सुंदर असते. याची लागवड नारळांच्या बागांमधून असते. झाड हिरवेगार दिसते व सुमारे ७|८ फूट वाढते. झाड लावल्यापासून सहा सात वर्षांनी त्याला फळे येतात व त्यांचा