पान:लंकादर्शनम्.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७५

फकीराने तें हैसोर प्रांती नेलें असें ह्मणतात.

 १६९० मध्ये डच लोकांनी सीलोनमध्ये प्रथमतः पद्धतशीर कॉफीची लागवड केली. ज्या ठिकाणी हवा सर्द व गरम असते व वार्षिक पर्जन्यमान सरासरी १०० इंच असते तेथे कॉफी चांगली पिकते. एका एकरांत सरासरी ४०० झाडे लागतात. अलीकडे सर्व जगभर संकर जातींची कॉफी लावण्याकडे प्रवृत्ति वाढत आहे. संकर जातींत रोगांची भीति कमी असते. लिबेरियन नांवाची जातं अशी आहे की तिच्या पासून नियमित आणि पुष्कळ उत्पन्न येते.

 सांप्रत हिंदुस्थानांत २ लक्ष एकरापेक्षा जास्त क्षेत्रांत कॉफी पिकते. म्हैसोरमध्ये यापैकी निमे क्षेत्र असून मद्रास इलाखंत १/४ क्षेत्र आहे. पूर्वी हिंदुस्थानांतून ४ ते ५ कोटि पौंड काफी परदेशी जात असे, परन्तु अलीकडे * ब्राझील देशाने बहुतेक काफीचा व्यापार हस्तगत केलेला आहे. इतर व्यापाराप्रमाणे काफीच्या व्यापारालाही दिवसें दिवस ओहोटी लागलेली आहे.

 काफीच्या झाडावर रोग आल्यापासून म्हणजे १८८७ साला पासून सीलोनमधील काफीची लागवड बंद झाल्यासारखीच आहे. सांप्रत तेथे फारच थोडे मळे आहेत.



दालचिनी

 दालचिनी ही सीलोनला ईश्वराकडून मिळलेली एक देणगी आहे. दालचिनीचे झाड मोठे असते. सरासरी उंची २५|३० फूट असून बुंध्याचा


 टीप :- जगांत दरसाल ३७५० दशलक्ष पौंड काफी पिकते, एकट्या ब्राझील देशांत २३८१ दशलक्ष पौंड काफी होते. कोलंबियामध्ये ३३६ द. लक्ष पौंड व डच ईस्टइंडीजमध्ये २४७ द. लक्ष पौंड काफीचे पीक येते बाकी राहिलेले ७८६ द. लक्ष पौंडाचे पीक जगाच्या निरनिराळ्या भागांत होते.