पान:लंकादर्शनम्.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७३



कोका

 सन १८७० पासून कोकाची झाडे सीलोन मधील चहाच्या मळ्यांत लावण्यास सुरवात झाली. हे झाड मूळ पेरु देशांतले असून दक्षिण अमेरिकेंत याची लागवड बरीच आहे. या झाडापासून कोकेन काढितात व कोकेनचा शोध लागल्यावर यूरोपची कोकेनची मागणी येऊ लागली.

 सीलोन, निलगिरीची उतरण, आसाम, हिमालयाच्या २००० फूट उंची पर्यंतचा काही भाग वं मद्रास इलाख्याचा काही भाग येथें ही झाडे वाढतात. या झाडांना धुक्याची फॉर भीति असते. जमीन कसदार व ओलसर ( पाऊस जास्त पडतो असा प्रदेश ) या झाडाच्या वाढीस असावी लागते. खत घालणे जरूर असते. हे झाड ६ ते ८ फूट उंच असून अगदी हिरवेगार असते. झाडाला फुलांचे सुंदर झुपके येतात. झाडाचें पान खाल्ले असतां भूक कमी होऊन नवचैतन्य प्राप्त झाल्यासारखे वाटते.

 हिंदुस्थान सरकारने या झाडाची माहीती अमेरिकेतून आणविली. रोपे लावल्यापासून १६ महिन्यांनी पाने तोडावयास सुरवात करितात. झाडे सुमारे ४० वर्षे टिकतात. पानें जून होऊन कडक झाली म्हणजे तोडतात व ती निर्घात ( एअर टाइट ) डब्यांत भरून यूरोपला पाठवितात, व तेथे त्यांतील अल्कलाइड व क्षार काढितात.

 या झाडाच्या ५|६ जाती आहेत. कांहीं जातींच्या झाडापासून काढलेल्या कोकेनचे स्फटिकीभवन होत नाही. कोकेनच्या उत्पत्तिवर व व्यापारावर सरकारचे नियंत्रण आहे. कोकेनच्या शोधापासून शस्त्रवैद्यकाला फारच मदत झाली. सीलोनच्या पिकांपैकी कोका हे एक महत्वाचे पीक आहे.



सुपारी

 सुपारी ही फार प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहे, सोप्पुघान व अरिक-झाड या दोन कानडी शब्दापासून सुपारी हा शब्द झालेला आहे