पान:लंकादर्शनम्.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७१

तोडून त्याची साल विकण्याचे बंद झाल्यावर दोन तीन वर्षांच्या जुन्या फांद्या तोडून त्यांतून क्विनीन काढण्यात येऊ लागले. सांप्रत झाड थोडे जून झाल्यावर तोडतात, मग बुधापासून नवीन धुमारे फुटतात. झाड तोडल्यावर बुधावर एक प्रकारची शेवाळी बांधून ठेवितात, यामुळे सालीची वाढ चांगली होते व तींत औषधीचे प्रमाणही वाढते.

 जावा व सीलोन येथील जाति भिन्न आहेत. दोन्हींतही शेकडा ६ प्रमाणे अल्कली सांपडते. परन्तु जावामधील जातींत क्विनीनचे प्रमाण ३.५ असते तर सीलोनमधील जातींत हे प्रमाण १.५ असते. एकाच जातीच्या साली निरनिराळ्याकाळीं ( भिन्न ऋतूंत ) व भिन्न स्थली घेतल्या तर त्यांतील औषधी प्रमाण भिन्न पडते; असे आढळून आले आहे. कांहीं सालींत हे प्रमाण शेंकडा १३ सांपडते तर कांहीं सालींत औषधी गुण कांहींच असत नाहीं. आजपर्यंत या बाबतीत शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून पाहिले आहेत. सालींतून क्विनीन, क्रिनिडाइन, सिंकोनीन व सिंकोनिडीन असे चार पदार्थ सांपडतात. क्विनिडाइन में क्विनीन पेक्षा जास्त जोरदार असें ज्वरघ्न औषध आहे. पण हे फार अल्प प्रमाणांत सांपडते. क्विनीन ही कडू औषधींची राणी आहे व आधुनिक पाश्चात्य वैद्याचे हातातील तीव्र शस्त्र आहे. डाक्टरच्या हातांतील क्विनीन काढून घेतले तर त्याचा निमा धंदा बसेल असे म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं.

 १८२० साली क्विनीन प्रथमतः काढण्यांत आले व मुंबई सरकारने ते १ पौंडास १८ पौंड १० शि. ८ पेन्स या दराने विकत घेतले. क्विनीन त्यावेळी फार महाग असे. क्विनीनची पैदास मोठ्या प्रमाणावर करण्याचे १८६१ सालीं ठरलें व तो प्रयत्न १८७४ च्या सुमारास यशस्वी झाला.

 सन १९२२ मध्ये कुलंपुरच्या क्विनीनच्या कारखान्यावरील मुख्य डॉक्टर 'फ्लेचर' यांजकडे लंडन मधील हॉवर्ड आणि कंपनीने अशी तक्रार