पान:लंकादर्शनम्.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७०

तद्देशीय रानटी लोकांनी या झाडाच्या सालीचे चूर्ण देऊन तिला बरे केले. यावरून काउंटेस सिंकानच्या नांवाने या झाडाची 'सिंकोना' ह्मणन प्रसिद्धि झाली.

 या झाडाची प्रसिद्ध झाल्यावरावर जेसुइट पंथाच्या परिव्राटांनी ही साल यूरोपमध्ये पाठविण्याचा धडाका सुरू केला. शास्त्रज्ञांनी आतांपर्यंत या झाडाच्या ३६ जाती शोधून काढिल्या आहेत त्या पैकी सध्यां फक्त १२|१३ जातींचाच क्विनीनची पैदास करण्यास उपयोग केला जातो.

 विषुववृत्ताजवळील १५ ते २० अंशापर्यंतच्या पर्वतश्रेणीमध्ये या झाडाची लागवड चांगली होते. समुद्र सपाटीपासून सुमारे ५ ते ८ हजार उंचीवर ही झाडे चांगली वाढतात व कांहीं झाडे ११००० फूट उंचीवर चांगली वाढतात. हे झाड ८० फूट उंच वाढते. पाने नेहमी हिरवीगार असतात. फुलांचा रंग पांढरा, किंचित् गुलाबी छटा असलेला असतो, फळ अंडाकृति असून विया चापट असतात.

 या झाडाचा शोध लागल्यावर लोक रानांत जाऊन झाडे तोडीत व साल बाजारांत विकीत. यामुळे झाडांचा निष्कारण संहार होऊ लागला. अशा तर्‍हेने झाडांचा संहार होऊ नये, अल्प किंमतीत साल मिळावी, सालीचा पुरवठा सतत करितां यावा ह्मणून १८४९ मध्यें अल्जेरियांत प्रथमतः झाडांची लागवड केली, पण तो प्रयत्न अपयशी ठरला. नंतर डच लोकांनीं जावा बेटांत लागवड केली व तेथून आज जगाला लागणाऱ्या क्विनीनचा निम्यापेक्षा जास्त पुरवठा होतो. जावा बेटांत साखर पुष्कळ होते. तोंड कडू झाल्यास साखर खावी, साखरेने तोंडास मिठी बसल्यास क्विनीनची पूड तोंडांत टाकावी.

 १८६० साली या झाडाची लागवड हिमालयाच्या उतरणीवर व निलगिरीवर करण्यांत आली व नंतर सीलोनमध्ये लागवड केली. झाड