पान:लंकादर्शनम्.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९

"क्विनीन काढण्याची पद्धति गुप्त राखण्यांत येत आहे तुम्हांस माहीती देतां येणार नाहीं". यावर मी चट्दिशीं उत्तर दिलें कीं, "तुह्मी पाश्चात्य लोकांनी आह्मां ब्राह्मणांना, व्याख्यानांतून किंवा तुह्मी लिहिलेल्या पुस्तकांतून 'ब्राह्मणांनी आपली विद्या गुप्त राखली इतर जातींना अज्ञानांतच ठविले' असा अनेकवार दोष दिला आहे. आह्मीं ब्राह्मणांनी प्राचीनकाळीं जी चूक केली तीच चूक आज विसाव्या शतकांत तुह्मी करित आहां. आज तर कोणतेही ज्ञान गुप्त राखू नये असे सर्वत्र सांगण्यांत येते." माझे उत्तर ऐकून तो आफिसर जरा गोंधळला व ह्मणाला "त्यांत काय आहे? डच लोकही आपली कृति गुप्त राखीत नाहींत कां? जाबामध्येही डच लोक आपल्या कारखान्यांतील पद्धति कोणास कळू देत नाहींत." मी ह्मणालों "याचा अर्थच असा की, ज्ञान गुप्त ठेवण्याचे जे पातक ब्राह्मणांनी केले तेच पातक डच लोक जाबाबेटांत करितात व डच लोक जें पाप करितात ते आपण करण्यास हरकत नाही असा तुमचा समज आहे." याप्रमाणे मी वाद घालू लागतांच तो गृहस्थ पुन्हा गोंधळला आणि त्याने माझ्या मुद्यास पूर्णपणे बगल मारून उत्तर दिले की, "माझा वरिष्ठ अधिकारी जंगल पहाणीस गेलेला आहे, त्याचे परवानगीशवाय मला कारखाना दाखवितां येत नाही." हे उत्तर मिळाल्यावर आह्मींही मुकाट्याने परत फिरलों.

 सीलोनमध्ये सिंकोनाची लागवड केव्हांपासून झाली व क्विनीनचा प्रसार कसा झाला, क्विनीनमुळे नवीन प्रदेश आक्रमण करणे कसे सुलभ झालें इत्यादि गोष्टी माहीत असणे जरूर आहे ह्मणून सिंकोनाचा इतिहास पुढे थोडक्यांत दिला आहे.

 पेरू प्रांतांतील लोकांना सिंकोनाच्या झाडाच्या सालीचे चूर्ण घेतल्याने ताप थांबतो ही गोष्ट माहीत होती. एकदां पेरूच्या गव्हर्नराची बायको काउंटेस सिंकान ही तापानें अजारी पडली. युरोपियन डाक्टरांनी तिला बरे करण्याचे नानाविध प्रयत्न केलें परन्तु त्यांस यश आले नाही. त्यावेळी