पान:लंकादर्शनम्.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८

मोटारी, व सायकली यांच्यामुळे हिंदुस्थानांतल किती तरी संपत्ति रबराचे मळेवाल्यांच्या घरी जाऊन बसत आहे. प्रत्येक मोठ्यागांवीं टांग्याला रबराची धांव लागल्यामुळे हिंदुस्थानची संपत्ति कशी धांव घेत परदेशी चालली आहे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. रबरी जोडे हातांत घेऊन विलासी श्रीमंतांचीं, आणि नौकरीँतच आपले आयुष्य खर्च करणाच्या सुशिक्षांतांची डोकीं पाश्चात्यधानिक व शास्त्रज्ञ झोडपीत आहेत. हिंदुस्ठानांतील लक्ष्मी रबरीचाकांच्या रथांत बसून परदेशी पळून जात असल्याने कोणताच ध्वनि उत्पन्न होत नाही, म्हणून हिंदुस्थानांतील धानिक व सुशिक्षित जागे होत नाहीत असे दिसते.

 जगांत फिरतांनां महत्वाचे पदार्थ कोणते आहेत ते ओळखणे व त्यांचा आपल्या देशाकरितां उपयोग करून देण्याकरितां बुद्धिसर्वस्व चिकाटीनें खर्च करणे हे पुरुषार्थाचे एक प्रमुख लक्षण आहे.

सिंकोना.

 सीलोन मध्ये सिंकोनाची लागवड बरीच आहे व सिंकानापासून क्विनीन काढण्याचे कारखानेही आहेत. क्विनीन कसे काढतात ते पहावे असा आमचा बेत ठरलेला होता. परन्तु उटकमंड येथे क्विनोनचा कारखाना असल्यामुळे उटकमंडला गेल्यानंतर क्विनोनबद्दलचा माहिती मिळवावी ह्मणून आह्मी सीलोनमध्ये कारखान्यांत गेलो नाहीं. उटकमंडवरून म्हैसोरला जातांना वाटेत आह्माला कारखाना लागला; तेव्हां सडकेंच्या कडेला मोटारी उभ्या करून मी व श्री. वाघ असे दोघेजण कारखान्यांत गेल व तेथे एका आफिसरला भेटून कारखाना दाखविण्याबद्दल विनंति केली. आफिसरने विचारले कीं, "क्विनीन कसे तयार करतात हे पहाण्यांत तुमचा काय हेतु आहे?" मी म्हणालो "आह्मी शास्त्रज्ञ नाहीं पण जिज्ञासु आहोत, आह्मांस असे वाटते की, कारखाना पाहिल्याने आमच्या ज्ञानांत थोडी भर पडेल." नंतर आफिसर पुन्हां ह्मणाल