पान:लंकादर्शनम्.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६

मध्ये गेलो त्यावेळी बैलगाडीला रबरी चाके लावूमं ती चालवून दाखविण्याचा प्रयोग कोलंबो येथे करण्याचे घाटत होते. रबराचा इतिहास फारच मनोरंजक आहे म्हणून तो पुढे दिला आहे.

 इतिहासः – युरोपियन प्रवासी व वसाहतवाले यांना कांगो नदीच्या खोऱ्यांत रबराच्या झाडाची माहिती झाली. झाडाचा चीक काढून त्याचा चेंडू करून खेळावे एवढाच त्यावेळी रबराचा उपयोग होत असे. रबरावर सुधारलेल्या जगाचे जीवित अवलंबून राहील हे त्यावेळी कोणाच्या स्वप्नी तरी आले असेल काय?

 या झाडाच्या सुमारे ६ मुख्य जाति आहेत. त्यापैकी बकुल कुलांतील झाड एशिया खंडांत विशेष चांगले वाढते. सर्व प्रकारची रबराची झाडे विषुववृत्तापासून दक्षिण व उत्तर बाजूस १५ ते २० अंशापर्यंत चांगली वाढतात.

 एका इंग्लिश प्रवाशाने प्रथमतः कांगोनदीच्या खोऱ्यांतून बरेचसे बीं इंग्लंडांत नेले व तेथें नानातऱ्हेचे प्रयोगकरून रबराची लागवड सीलोन बेटांत व त्याच्या जवळील प्रदेशांत चांगली होईल असे ठरिवले. लागलीच इंग्रज व्यापारी रबराचा धंदा करण्यास तयार झाले. १८७६ साली सुमारे ७००० रोपें सीलोनच्या किनाऱ्यावर उतरविली व २१ रोपे सिंगापूरकडे नेली. या रोपांपैकी जी रोपें जगली त्यांची संतति म्हणजेच आजच्या रबराच्या बागा होत. सन १८८१ सालीं सीलोन येथे रवर प्रथमतः तयार झालें.

 रबराचे बी एरंडीसारखं असतें, परन्तु आकाराने ते एरंडीच्या २५ पट मोठे असते. बीं रुझू घातल्यावर ६ महिन्यांत २|३ फूट उंचीचा रोपा तयार होतो. १|| वर्षांनंतर हा रोपा उपटून दुसऱ्या जागी (कायम जागीं) लावण्यांत येतो. ३०|३५ वर्षांनंतर झाडाचा बुंधा सुमारे ५|६ फूट परिघाचा होतो. झाड ५० ते ७५ फूट उंच वाढते. झाडे ५|७ वर्षांचे