पान:लंकादर्शनम्.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५


रबर होतो व बाकीचा ४८ सहस्त्र टन इतर देशांत होतो. यावरून रबराच्या उत्पत्तिमध्ये सीलोनचा जगांत तिसरा नंबर आहे असे दिसून येते.

 आम्ही रबराचा कारखाना पहावयास गेलो होतो तेव्हां, त्या कारखान्यावरील युरोपियन मॅनेजर म्हणाला की "कांही वर्षांपूर्वी रबराचा व्यापार म्हणजे सोन्याचा प्रत्यक्ष झरा होता. पण आमच्या दुर्दैवाने आता ते दिवस राहिले नाहीत. पूर्वी अगदी कच्च्या रबरास दरपौंडी ३ किंवा ३|| रु. आम्हांस मिळत असत." रबराचे झाड चांगले वाढलें म्हणजे दरसाल ४० पौंड रबर मिळतो; म्हणजे एका झाडाचे वार्षिक उत्पन्न १२० रुपयांचे झाले. दरसाल १२० रुपये विनासायास मालकास देणारे कोणतेतरी झाड आहे का याचा ज्याचा त्यानेच विचार करावा. रबराच्या मळेवाल्यांना याप्रमाणे पूर्वी पैसा मिळाला व ते लक्षाधिपति झाले; रबराच्या मळ्यांचे शेअर्स ज्यांनी घेतले होते त्यांना "डिव्हिडंडच्या रूपाने" पैसाही अतोनात मिळाला. तेव्हां प्रस्तुतकाली रबर फार स्वस्त झाल्यामुळे रबराच्या मळे-वाल्यांना फार वाईट वाटत आहे. सीलोनमध्ये झाडांचा रस गोळाकरून तो घट्ट झाल्यावर यंत्रांत घालून पाणी काढून टाकितात व नंतर तो परदेशी पाठवितात. सीलोनमध्ये रबराचे कोणतेही पदार्थ होत नाहीतसे दिसते. रबराच्या मळ्यांतून काम करणाऱ्या मजूरांत शेकडा ९५ तामीळ आहेत. रबराची चीक गोळा करण्याची मजूरीच कायते तामीळ व सिंहली लोकांस मिळते.

 रबराचे निरनिराळे पदार्थ तयार करण्याचे कारखानेच सीलोनमध्ये फारसे नसल्यामुळे औद्योगिक शिक्षण, उच्चदर्जाचे काम केल्याबद्दलची मजूरी किंवा जबाबदारीची कामें अंगावर घेतल्यामुळे येणारा अनुभव यापैकी एकही गोष्ट सिंहली किंवा तामीळ लोकांना साध्य करून घेता येत नाहीं.

 अलीकडे सीलोन गव्हरमेंट व डच गव्हरमेंट यांच्यामध्ये रबराची लागवड नियमित करण्याबाबद कांहीं ठराव झाले आहेत. आम्ही सीलोन-