पान:लंकादर्शनम्.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२

अत्यंत कमी दर्जाची असते. नंतर हा चहा डब्यांत किंवा पेट्यांत घालन विक्रीस पाठविला जातो.

 सीलोन, आसाम, ब्रह्मदेश वगैरे ठिकाणीं यूरोपियन मळेवाल्यांच्या हातांत चहाचे मळे आहेत. बंगालमधील पुष्कळशा तागाच्या गिरण्याही यूरोपियन लोकांच्या ताब्यांत आहेत, चहा, ताग, मसाले वगैरे पदार्थाचा पौर्वात्य देशांनां परमेश्वराने जणू कांहीं मक्ताच दिलेला आहे. परंतु नवीन प्रदेश आक्रमणकरणे किंवा स्वतःचा मुलूख राखणे या कामी जसे हिंदी लोकं परकीयांच्या पेक्षां नीरस ठरले, त्या प्रमाणे निरनिराळी व्यापारीक्षेत्रे आपल्या ताब्यांत ठेवण्याच्या कामीहीं नीरस ठरले आहेत. व्यापार ताब्यात राहण्यास राजकीय सत्तेचे पाठबळ पाहिजे हे निर्विवाद आहे पण लोकांच्या अंगहीं दूरदृष्टि, धाडस, सतत उद्योग करण्याची शक्ति आणि व्यापारी सचोटी हे गुण अवश्य असावे लागतात.

 १ चहाचे मळेवाल्यांना मळ्यांच्या जमीनी पुष्कळदां मोफत किंवा अत्यल्प किंमतीस मिळाल्या.

 २ मळ्यावर इमारती बांधण्यास लांकूडफांटा वगैरे सामान स्वस्त दराने मिळाले.

 ३ एका विशिष्ट प्रकारच्या पद्धतीमुळे जरूर तितके मजूर नेहेमीं काम करण्यास मिळू लागले व त्यांजकडून ठराविक वेळ (दररोज) काम करून घेता आले.

 ४ मजूरीचे दर स्थिर राखता आले व याचा फायदा मळेवाल्यांस मिळाला.

 ५ चहाचे मळे काही थोड्या भांडवलवाल्यांच्या हाती असल्यामुळे त्यांना आपल्या मालांच्या किमती आपल्या इच्छेनुरूप ठरवितां आल्या व त्यामुळे वाटेल तितका नफाही मिळविता आला.