पान:लंकादर्शनम्.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 यापुढे हिंदी तरुणांना तीव्रतम अंसा जीवनकलह करावा लागणार आहे आणि या कलहाकरितां त्यांनी सुसज्ज असावे ह्मणून त्यांना शाळांतून किंवा कॉलेजांतून आज निरनिराळ्या देशांत काय चालले आहे याचे निदान स्थूलज्ञान मिळाले पाहिजे. पण दुर्दैवाने पुण्यासारख्या ठिकाणी ब-याच हायस्कूलमध्ये "जपानी स्त्री काम करितांना आपले बालक पाठीवर घेते" हे मनावर बिंबविण्याकरितां पाठीवर मूल असलेल्या जपानी स्त्रीचे मोठे चित्र भिंतीवर लावलेले दिसते व तसेच निग्रो लोक शोषत राहतात हे शिकविण्याकरितां अगदी वरच्या वर्गावरील शिक्षक झोपडीचे चित्र फळ्यावर काढण्याचा खटाटोप करितो. खरोखर पाहिले तर मूल घेऊन काम करावयाचे असेल तर मुलाकरितां मानवी शरीरांत पाठीइतकी सोईस्कर जागाच नाहीं, हिंदुस्थानांतील कामकरी वायाही मुलें पाठीवरचे घेतात. तेव्हां अशा प्रकारची चित्रे काढण्यांत आणि पहाण्यांत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपला वेळ गमावण्याचे कांहीं कारण नाहीं. हिंदी तरुणांचे लक्ष्य यापुढे तरी उद्योग धंद्याची वाढ कशी होत आहे, इतर देशांत निरनिराळ्या मालाची पैदास कशी करीत आहेत याकडे लागले पाहिजे व त्यानीं आंकड़े शास्त्राचा अभ्यास करण्यास शिकले पाहिजे असे मला वाटते, व म्हणून चहा, काफी, रबर वगैरेबद्दल माहीती देतांना मी आकड्यांचा जरा जास्त उपयोग केला आहे. प्रस्तुत पुस्तक हे धड प्रवास वर्णनही नव्हे" व धड सीलोनचा भूगोलही नव्हें "असेंहीं कांहीं वाचकांस वाटण्याचा संभव आहे हे मला माहीत आहे, परन्तु केवळ वर्णनात्मक पुस्तक लिहिणे मला पसंत नसल्यामुळे प्रचलित प्रवासवर्णनात्मक पुस्तकांच्या पद्धतीस सोडून हे पुस्तक लिहिलें अहे.

नारायण गोविंद पिंगळे