पान:लंकादर्शनम्.pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



५२

पलीकडे कन्या नांवाचे उष्ण झरे आहेत. त्यांचे उष्णतामान १०० ते ११० डिग्री असते. या झ-याबद्दल तामीळ लोक पुढील प्रमाणे दन्तकथा सांगतात.

 "कन्या नांवाची रावणाची सापत्न माता होती. ती कुमारिका होती. रावण एकदां कांहीतरी अनिष्ट गोष्ट करण्यास निघाला. त्याला आपल्या हेतूपासून परावृत्त करण्याकरितां श्री विष्णु वृद्धाचे रूप घेऊन आल व त्यांनी रावणास कन्या मृत झाली आहे असे सांगितले. यामुळे रावणान पुढे जाण्याचे रहित केले आणि तेथेच मातेचे उत्तरकार्य करावे असे ठरविले. विष्णु जेथे उभे होते तेथे उष्णोदकाचा झरा वाहूं लागला व विष्णु अदृश्य झाले. विष्णु अदृश्य झाल्यानंतर तेथे उप्तन्न झालेल्या झ-याच्या कांठीं राव णानें कन्येचें उत्तरकार्य केले. यामुळे त्या उष्णोदकाच्या झन्यास कन्या असे नांव पडले."

 (२) नुवाराएलिया पासून ४ मैलावर सर सॅम्युअल बारकर नांवाचा जो प्रसिद्ध संशोधक होऊन गेला त्याचे स्मारक म्हणून बारकर फार्म आहे. तेथून पुढे २ मैलावर सीता एलया आहे. सीतेच्या नांवाचे किंवा सीता या नांवाचे "सीता एलिया" हे एकच ठिफाण सीलोनमध्ये आहे.

 (३) हनुमानाने रावणाची नगरी जाळल्यावर खालील जमीन सोन्याचा झाली अशी कथा हिंदूंच्या कांहीं पुस्तकांतून दिलेली आढळते.

 वरील तीन्ही गोष्टींचा एकत्र विचार केल्यास थोडेसे अनुमान का ढता येते. सीलोनमध्ये सोन्याची जमीन म्हणजे अत्यंत मूल्यवान् जमान रत्नपुरम् जवळ आहे. तेथे आज कित्येक शतकें रत्नें सांपडत आहेत: अर्थात् जाळपोळीनें जी जमीन सोन्याची झाली असे म्हणतात तो भा" रत्नपुरंचा असावा असे दिसते. सीतेला अशोक वनांत ठेविलेले हात असे रामायणांत वर्णन आहे. अशोकवन म्हणजे ज्या ठिकाणी दुःख उत्पन