पान:लंकादर्शनम्.pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



४७

 तृष्णेवर पूर्ण जय मिळावा, सुखोपभोगाची यात्किाचेत् इच्छा होऊ नये झणून भिक्षु “आरण्यकशील' बाराही महिने अरण्यांत रहाण्याचे शीट पाळीत, रुक्खमूलिकंगशील पाळणारांना वृक्षाच्या आश्रयाखेरीज कोणताही आश्रय घेण्याची परवानगी नसे. भिक्षु अशक्त किंवा आजारी असला तर त्यास गुहेत राहण्याची परवानगी मिळे. ही जी अशक्त किंवा आजारी भिक्षुस परवानगी मिळे त्यामुळे निरनिराळ्या डोंगरामध्ये गुहा तयार झाल्या व अजिंठा, वेरूळ वगैरे ठिकाणच्या लेण्यांचा उगमही या आरण्यकशीलांतच आहे. भिक्षुवर नाना त-हेची नियंत्रणें होतीं.

 चित्ताची एकाग्रता कशी करावी. भौतिक जगाचा पूर्ण विसर पडण्यास काय करावे इत्यादि गोष्टींचा समाधिमध्ये विचार केलेला आहे. चित्ताची एकाग्रता व्हावी ह्मणून अग्नि, वायु, सूर्य इत्यादिकांवर चित्ताची एकाग्रता करावी, स्मशानांत जाऊन रक्त, मांस व अस्थि यांकडे पाहून हैं सर्व शरीर नाशिवन्त आहे त्याच्या पोषणांत किंवा त्याला सुशोभित करण्यांत मानवीशाक्त खर्च करूं नये इत्यादि अनेक गोष्टीचा वारिक विचार समाधिमध्ये केलेला आहे.

 बुध्द आणि त्याची सत्कृत्ये यांचे चिंतन करणे याचा अन्तर्भाव अनुस्सतिमध्ये होतो. आसन आणि प्राणायाम यांचा फारसा विचार कोठेही केलेला नाही.

 पान्तजल योगशास्त्र आणि बुध्दाचे समाधशास्त्र यांचा अद्यापपावेतों तुलनात्मक अभ्यास कोणी केलेला दिसत नाही. तेव्हा कोणी अभ्यासकानें हा विषय अभ्यासास घेतल्यास फलदायक होईल.}}

 बध्दभिक्षु हा ईश्वराची प्रार्थना करीत नाही, किंवा ईश्वराने आपणास पापाची क्षमा करावी किंवा आपल्यावर दया करावी असे कधीही ह्मणत नाही. त्याची कर्माबद्दल किंवा कर्मवादाबद्दल दृढश्रध्दा असते. तो शील आणि ध्यान यांच्या साह्याने तृष्णा ताब्यात ठेवण्याचा किंवा तिचा नाश