पान:लंकादर्शनम्.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमच ठरलेले असल्यामुळे निष्कारण वेळ फुकट गेला नाहीं व त्यामुळे थोड्या वेळांत बरीच प्रसिद्ध स्थळे पाहून झाली.

 आह्मी सीलोनमध्ये फारच थोडे दिवस होतो व दहा पंधरा दिवसांच्या कालांत सीलोनची सर्वांगीण माहिती मिळणे अशक्य आहे. तथापि प्रत्यक्ष स्थलदर्शनं व ग्रंथावलोकन यांच्या संयोगाने मराठी वाचकांकरिता सीलोनचे वर्णन लिहावेसे वाटल्यावरून हे लहानसें पुस्तक लिहिलेले आहे.

 आधुनिक लेखकांनी प्रवास वर्णनांत स्वतःबद्दलची पुष्कळशी माहीती दिलेली असते व ठिकठिकाणी सृष्टीसौन्दर्याची रम्य वणन दिलेली असतात. परन्तु माझा समज असा आहे की, लेखकाने आपली बारीकसारीक सुखदुःखें वाचकास सांगून त्याचा वेळ घेऊ नये व सृष्टिसौन्दर्याचा आस्वाद डोळ्याने घ्यावयाचा असल्यामुळे लेखकाने शब्दसृष्टि उत्पन्न करू नये. माझी स्वतःची समजूत अशी असल्यामुळे " आमचा सकाळचा चहा कसा झाला होता " " सष्टिदेवीने हिरवा शालू परिधान केला आहे असे केव्हा केव्हा वाटले ” हे सांगण्याचे शक्य तितकें टाळले आहे.

 वाचकांना प्रवासांतील अडचणी कळाव्यात; आर्थिक, सामाजिक व धार्मिक स्थितिची कल्पना यावी; प्रमुख अशा दर्शनीय स्थळाबद्दल जरूर ती माहीती मिळावी याच मुख्य हेतूने प्रस्तुत पुस्तक लिहिलेले आहे. गेल्या साठ सत्तर वर्षांत पाश्चात्य लोकांनी चहा, रबर, तेल, कोळसा, कोयनेल, लोखंड वगैरे पदार्थाची निपज वाढविण्याचा दीर्घ प्रयत्न करून विषुवृत्ताजवळील अत्यंत सुपीक असे प्रदेश आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत. विषुवृत्त ही पृथ्वीची मेखला असून जावा, सुमात्रा, सीलोन इत्यादि वेटें ही त्या मेखलेस लटकलेली अमूल्य रत्ने आहेत ही कल्पना मनावर ठसावी; चहा, रबर, सिंकोना वगैरे पदार्थांचा व्यापार किती मोठा आहे, तो व्यापार वाढवून आणि आपल्या ताब्यात ठेवून पाश्चात्य व्यापा-यांनी कसा अचाट नफा मिळविला याची कल्पना यावी हाणून वरील पर्दाथाबद्दल वर्णन देतांना ५४ ते ९४ पानांत बराच विस्तार केलेला आहे.