पान:लंकादर्शनम्.pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४३

प्रसार करण्याकरितां सीमेनमध्ये पाठविले. त्यांत अशोकाचा भाऊ महींद्र हा होता, सीलोनचा राजा तिस्स याने बुद्धधर्माचा स्वीकार केला व तेव्हा पासून बुद्धधर्म हा राष्ट्रीय धर्म झाला, महींद्र सोनमध्ये खिस्तपूर्व २०४ सालीं दिवंगते झाला.

 सिंहली राजे धर्मनिष्ठ, उदार व शूर असे असत, धर्माची अभिवृद्धि व्हावी ह्मणून कित्येक राजांनीं बुद्धभिक्षूनां आश्रय दिलो, मोठमोठाले धर्ममठ स्थापन केले चे प्रजेसही चांगल्या रीतीने वागविले. अपवाद म्हणून एखादी राजा अगदी कमी दर्जाचाही निघे. तथापि एकंदरीत सिंहली राजे चांगले होते असे ह्मणावयास हरकत नाही. या प्राचीन राजांत चलंगवाहु वे दत्तगामिनी. या राजांनी फारच चांगली कीर्ति मिळवली. तथापि हे राजे परकीय स्वाच्याबद्दल थोडेसे बेफिकीरच असत.

 उत्तम रीतीने अरमार वाढवून आपल्या वेशाचे संरक्षण त्यांस करितां आले नाही. इतर ठिकाणी ज्या प्रमाणे पाश्चात्यांच्या धाडी गेल्या त्याप्रमाणे पोर्तुगीजांची १५०६ साली धाड येऊन त्यांनी समुद्रा लगतचा भाग घेतला. समुद्रकांठ परकीयांच्या ताब्यात गेला याचा सरळ अर्थ असा की सीलोनच्या कंठास गळफास बसला सिंहली राजे वेटाच्या मध्यमागी जाऊन आपला कारभार पाहू लागले, समुद्र कांठ शत्रूच्या ताब्यात गेल्यावर पारतंत्र्याचा फास जास्त घट्ट होऊन आंतील राजे गुदमरून मरणार हे इ. स. १५०६ मध्येच निश्चित झाले.

 पोर्टूगीज लोकांनी खिस्तेधर्माचा प्रसार करण्याकरिता हिंदुस्थानांत ज्याप्रमाणे जुलूम केला त्याप्रमाणे सीलोन मध्येही जुलूम केली. आपली लोकसंख्या वाढावी ह्मणून तद्देशीय स्त्रियांशी लग्ने केली. सीलोनी स्त्रियांशीं । लग्न लावणारास नौकरींत बढती मिळणे वगैरे नाना प्रकारची आमिर्षे असत.