पान:लंकादर्शनम्.pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३८

पाणी कमी झाले म्हणजे अगदी दिवसा १०-१२ वाजतां ते दुस-या तळ्याकडे जातांना दिसतात. कित्येक जातींच्या माशांना चिखलांत पुरून घेग्याची शाक्त आहे. या बेटांत बुद्ध धर्माचे जरी लोक आहेत तरी त्यांच्या जेवणांत बहुधा मासा हा असतेच. बुद्ध देवाने एका बाईंच्या घरी जाऊन मांस भक्षण केले होते असा * महापनिव्वान सुत्तांत उल्लेख आहे.

 प्लॅबॅगो धातूच्या व रत्नांच्या लहान मोठ्या खाणी पुष्कळच आहेत. पेरहेरा नांवाच्या वौद्ध धर्मीय उत्सवाच्यावेळी अॅडॅम्स् पीक नांवाच्या डोंगराजवळ असलेल्या रत्नपुरम् या गांवीं दरसाल रत्नांचा बाजार भरतो.

 प्लंबॅगोच्या खाणी फारशा खोल नाहींत. धातु शोधण्याचे काम गवती छपर असलेल्या इमारतींत चालते. या कारखान्यांना कौलं घातली तर कौलांच्या फटींत या धातूचे बुळबुळीत कण सांचल्यावर कौले घसरून खाली येतात व फुटतात.

 रबर, चहा व नारळ यांचे सुमारे १२०० कारखाने आहेत. जंगलांत उत्तम इमारती लाकूडही पैदा होते, एवोनी व साटीन या झाडाबद्दल सीलोनची फार प्रसिद्ध आहे. उत्तम सागवानही बरेंच आहे. बांबूचे नानाविध पदार्थ करून कांहीं लोक पोट भरतात. बांबूची बाद या देशांत विलक्षण होते. कित्येक बांबू १०० फूट उंच वाढतात व त्यांचा बंधा कापला तर पाणी भरण्याचे मोठे बकेट तयार होते.

खनिज संपात्ति

 पेन्सिल तयार करावयास लागणारा प्लंबगो नांवाचा धातु या बेटांत विशेष सांपडतो. येथे १८६ खाणी चालू आहेत. आणि दरसाल १५४५०० टन धातु परदेशी पाठविला जातो. मुशी करितां, कोरडे घणणाकरितां व पेन्सिली करितां या धातूचा सध्यांच्या यांत्रिक युगांत फ