पान:लंकादर्शनम्.pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३२


 हिंदुस्थनिांतून जातांनां रुपये किंवा नोटा नेल्या ह्मणजे काही अडचण पङत नाहीं. परत येतांनां जर सिंहली सेंट जवळ असतील तर देऊन टाकून त्याची हिंदी नागी करून घ्यावीत. बोटीवरच एक्सचेंज ऑफिस असते. सीलोनमध्ये पत्रव्यवहार करण्यास पोस्टाचे दर हिंदुस्थानांतील दरासारखेच आहेत, सीलोनला पत्र पाठवावयाचे असल्यास जास्त पोस्टेज पडत नाहीं.

 लोक सीलोनची लोकसंख्या सुमारे पन्नास लक्ष आहे. हिंदू, मुसलमान, खिस्ति, बुद्ध, ( सिंहली ) बरगर्स आणि वैद्द अशा लोकांची वस्ति येथे आहे.

लोक


 सीलोनमधील मूळच्या लोकांस वेद असे ह्मणतात. ते अरण्यांत आणि गरांत राहतात. जंगलांतील कंदमुळे व शिकार यांवर ते आपली उपजाविका करतात. हे लोक वर्णाने काळे घ ठेगू असून त्यांचे डोक्यावर लोकरीसारखे दाट केस असतात, त्यांचेपैकी पुष्कळांना स्नान फारसे ठाऊकच नाहीं, कांहींना वस्त्राचाही उपयोग माहीत नाही. हे लोक स्वभावाने थोडे भित्र आहेत, अस्सल वैद्द पहाणे असल्यास विंटेन नांवाच्या भागांत जा जरूर आहे. या भागांत अरण्य अत्यंत दाट आहे व या अरण्यावरून अनुष्याचा क्रांतिकारक हात अद्याप फिरलेला नाही. यामुळे या प्रांतांत प्रवास करणे फार धोक्याचे काम आहे.

 कित्येक वेद्द लोकांनी सिंहली लोकांशी बेटिव्यवहार केल्यामळे व सुधारले आहेत. अलीकडे वेद्द लोकांची संख्या फार झपाट्याने कमी होत चाललेली आहे व कदाचित् थोडेच दिवसांत ते या भूतलावरून पूर्णपणे नष्ट होतलिसे वाटते.

 प्राचीनकाळी विजय नांवाच्या राजपुत्राबरोबर उत्तर हिंदुस्थानांतूय जे लकि तेथे गेले त्यांच्या वंशजांस सिंहूली असें ह्मणतात,