पान:लंकादर्शनम्.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१

या तिकिटाने रेल्वेचा वाटेल तितका व वाटेल त्या मार्गाने प्रवास करतां येतो.

 शहरांतून फिरण्यास रिक्शा व टांगे मिळतात. टांगे फार थोडे असतात. रिक्शा व टांगा यांना भाडे किती पडते ते पुढे दाखविले आहे.

रिक्षा व टांगा भाडे
(कोलंबो)
टांगा रिक्षा
अर्धातास रु. से. ५० दहा मिनिटें १५ सें.
सहा तास रु. ५० अर्धा तास ५०
एक तास ३५

  १ तासापुढे दर अर्ध्या तासास १० सेंट. संध्याकाळी ७ पासून सकाळी ६ पर्यंत वरीलदरापेक्षा ५ सेंट जास्त द्यावे लागतात.

(कॅंडी)
टांगा रिक्षा
सकाळी ६ ते सायंकाळ ७ ५ रु. दिवस रात्र
सतत ६ तास २-५० सें. पहिला अर्धातास ३० सें. ३५
एक तास १-२० १ तास ६० " ७०
पुढे दर अर्ध्यातासास ३० सें. पुढे दर तासास १५ ,, २०
अर्धा तास ६० सें.

 हिंदुस्थानांतून सीलोनमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांस वाहनाची स्थूल कल्पना यावी ह्मणून वरील माहिती दिली आहे. पुणे, मुंबई, सातारा, नासिक या शहराप्रमाणें सीलोनमध्ये टांगे वाटेल तेथे मिळत नाहींत. बहुतेक रिक्षांतून प्रवास करण्याचा प्रघात फार. टांगे फार थोडे आहेत.

सीलोनी नाणें

 हिंदस्थानांतील रुपया व सीलोनचा रुपया एकच आहे. हिंदी पावलीही तेथे चालते. सीलोन सरकारच्या १, २, ५, १०, ५०, १००, ५०० व हजार रुपयांच्या नोटा असतात. रुपयाच्या खालील नाणें सेंट हे होय. शंभर सेंटचा एक रुपया होतो. ५, १०, २५ व ५० सेंटची रुप्याची नाणी असतात. तांब्याचेही सेंटचे नाणे आहे.