पान:लंकादर्शनम्.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०

शीतस्थले येथे असल्यामुळे अनेक युरोपियन आफिसर्स व व्यापारी यांची ये जा चाललेली असते यामुळे एथे दळणवळणाचे मार्ग चांगले आहेत.

 ( १ ) कोलंबो हे ब्राडगेज रेलवेचे केंद्र आहे. तेथून अनुराधपुरास एक फाटा जातो व तेथून एक ब्रॅंच लाईन "तालिमनार" या बंदराकडे जाते व मुख्य लाईन जॉफनाकडे जाते.

 ( २ ) कोलंबोपासून कॅंडीपर्यंत एक रस्ता जातो.

 ( ३ ) गॅलबिंदरापासून मांतरापर्यंत एक रस्ता जातो.

 रेल्वेखेरीज पक्या सडका सर्वत्र आहेत. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही कीं, मोठमोठ्या सडका ह्मणजे ७५|१०० मैल लांबीच्या सडका डामरी आहेत त्यामुळे मोटारी, बैलगाड्या वगैरेच्या वाहतुकीस फार सौख्य होते. मुख्य सडकेपासून रबराच्या किंवा चहाच्या मळ्यापर्यंतही सडका नेलेल्या आहेत. आगगाड्यामध्ये विशेष गर्दी नसते. हिंदुस्थानातील रेल्वेचे दरा पेक्षां तेथील दर अधिक आहेत.

 कोलंबो हे येथील मुख्य बंदर आहे व येथे आफ्रिका, आस्त्रेलिया, युरोप, चीन व हिंदुस्थान वगैरे बहुतेक देशाची जहाजे कोळसा व पाणी घेण्याकरितां येतात यामुळे या बंदरास आंतरराष्ट्रीय बंदराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. समुद्रकांठी धक्के बांधल्यामुळे हे बंदर विशेष सुरक्षित झाले आहे.

 गँँले हे निसर्ग निर्मित बंदर आहे परंतु बंदरांत शिरण्याचा मार्ग खडकाळ भागांतून जात असल्यामुळे जहाजांच्या अप्रतिहत संचारास धोक्याचे आहे.

 ट्रिंकोमाली हे नैसर्गिक असे सुंदर बंदर आहे. येथे डच लोकांनी दोन मजबूत किल्ले बांधले होते व तेथें कित्येक दिवसपर्यंत सैन्य होते सांप्रत तेथील सैन्य काढून घेण्यात आले आहे.

 प्रवाशांच्या सोयीकरितां रेल्वेची स्वस्त दराची तिकिटें मिळताते. २ आठवड्याच्या व महिन्याच्या तिकिटांनां ५० व ७५ रु. अनुक्रमें पडतात.