पान:लंकादर्शनम्.pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना


 डेक्कन कालेजांतील सुप्रसिद्ध संस्कृताध्यापक प्रो. एस. के. वेलवलकर यांच्या सूचनेवरून मी स. १९११ मध्ये पालीभाषेचा अभ्यास करू लागले. पुढे १९१२ साली प्रो. धर्मानन्द कोसांबी हे अमेरिकेतून परत येऊन पुण्यास राहिले . तेव्हां एक दिवस त्यांचेकडे जाऊन त्यांस पाली शिकविण्याबद्दल मी विनात केली. प्रो. धर्मानंदानी माझी विनंति अत्यंत आनंदाने मान्य करून शिकविण्यास सुरवात केली. प्रो. धर्मानंद दररोज कांहीतरी उपयुक्त माहिती सांगत व आपण नेपाळ, सीलोन, ब्रह्मदेश इत्यादि ठिकाणी कसा प्रवास केला याचे अत्यंत रसभरीत वर्णन देत. त्यामुळे आपणही सीलोनला जाऊ जन संपादन करावे असे माझे मनाने घेतले; पण त्यावेळी मी नौकरींत कायमही झालों नव्हते, त्यामुळे मनांतील विचारांची पूर्तता करणे शक्य नव्हते. सन १९१४ मध्ये सीलोनमधील जाफना प्रांतांत संस्कृत अध्यापकाची जागा मिळविण्याची खटपट केली पण तींत यश आलें नाहीं.
 सन १९१४ मध्ये जागतिक युद्ध सुरू झाल्यामुळे महर्गता अत्यंत वाढली व त्यामुळे रजा घेऊन जाणे अशक्यच झाले. पुढे अनेक अडचणीमुळे सीलोनला जाण्याची व अध्यर्थनीचा विचारच सोडून द्यावा लागला. सन १९३० मध्ये सीलोनच्या सदीप व्याख्यानाकरितां नोटस् ( टिप्पणे ) तयार करण्याचे काम शाळाखात्याने मजकडे दिले. हीं टिप्पणे तयार करफ्याकारतां जे ग्रंथ मला वाचावे लागले त्यामुळे सीलोनमध्ये जाण्याची पुन्हां तीव्र इच्छा झाली. परन्तु २१ वर्षे प्रत्यक्ष नौकरी (Active Service) झाल्याशिवाय रजा घेऊ नये असे मी ठरविले होते. त्यामुळे सन १९३३ पर्यंत मला आपली इच्छा दाबून ठेवावी लागली. सन १९३३ च्या फेब्रुवरीत मी रजेवर गेलों.