पान:लंकादर्शनम्.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



२५

ताबडतोब जाता येते.
 ( ३ ) प्रत्येक पॅसेंजरबद्दल ५० रू. मंडपम् कॅपमध्ये अनामत ठेऊन जातां येते. ही रक्कम पॅसेंजरला परत येतांना मिळते. बाकीच्यांनां मंडपम् येथे ६ दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागते क्वारंटाइनमध्यें न रहातां ज्यांना सीलोनमध्ये जाऊं दिले जाते त्यांनी तेथे गेल्यावर १२ दिवसपर्यत दररोज मेडिकल ऑफिसरकडे हजर रहावे व आपण निरोगी आहो असा दाखला घ्यावा.
( ब ) देवी टोंधून घेतल्याबद्दल अगदी अलीकडच्या खुणा नसल्यास देवी टोचून घ्याव्या लागतात.

( क ) प्रवासी कोणत्याही वर्गाने प्रवास करीत असला तरी देवी टोचण्याकरितां आणि सर्व सामान निर्जतुक करण्याकरितां त्यास २४ तसिपंर्यत मेडिकल ऑफिसरला थांबवून ठेवितां येते,

( ड ) मुंबईहून किंवा मद्रासहून समुद्रमार्गे प्रवास करणारांनी प्रथमतः पोर्ट सर्जन कोलंबो यांस लिहून माहीती मागवावा ह्मणजे आयते वेळी त्रास पडणार नाही,

 सीलोनमध्ये गेल्यावर तेथील मेडिकल ऑफिसर समोर दररोज हजर राहण्याची अट कधीही मोहूं नये, ही अट मोडल्यास एक हजार रुपये पर्यंत दंड होतो.


सीलोन

 हे लहानसें रमणीय बेट हिंदुस्थानच्या अगदी जवळ आहे. तथापे हिंदुस्थानांतील आणि सीलोनमधील वनस्पति व प्राणी यांत इतकी भिन्नता