पान:लंकादर्शनम्.pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



२३

हिंदुस्थानांतील कोणीही गृहस्थ आले तर त्यांस आम्ही आनंदाने मद्दत करितो असे सांगितले. मी त्यांचे आभार मानून सलोनमध्ये जाण्याकरिता आम्ही आमचे तरुण लोकांस उत्तेजन देऊ असे म्हणाले.

 नंतर मी ऑफिसमध्ये डिपाझिट ( अनामत ) रक्कम घेण्यास गेलो. मी ऑफिसत गल्याबरोबर कारकुनाने टाइपरायटरवर पावती तयार करून पैसे दिले. कारकुनाने मला इतक्या लवकर मोकळे केले की त्यावद्दल आश्चर्य वाटले. महाराष्ट्रांतील अनेक ऑफिसांतून मला जाण्याचे प्रसंग आले आहत पण बहुतेक प्रसंगी आलेल्या माणसाचे काम चटकन् न उरकतां निष्कारण उशीर करण्याकडेच महाराष्ट्रीयांचा कल असतो असे दिसून आले.

 मंडपम् कॅपमधील पोलीस, डॉक्टर, सुपरिंटेंडेंट, क्लार्क वगैरे सर्व मंडळी फारच चांगल्यारीतीने वागतात असे दिसून आले. आह्माला प्रथमतः वाईट चहा आला हे खरे पण तो चहा कान्टॅक्ट घेतलेल्या कंपनीचा होता हे लक्षात घेतले पाहिजे.

 प्रत्येक ऑफिसरने किंवा इतर नोकराने प्रथमतः आपण नागरीक आहो व आपणाला मिळालेला अधिकार इतरांच्या सुखसोयी व हित पाहप्याकरितां मिळालेला आहे व त्याचा उपयोग आत्माहताकरिता करणे गैरआहे हे लक्षात ठेविले पाहिजे.

 आमच्याशी निरनिराळे ऑफिसर्स तर चांगल्यारीतीने वागलेच पण साध्या पोलिस शिपायांनी, टांगे पाहून देणे, वाट दाखवणे, धर्मशाळेत नेऊन पोहोचविणे इत्यादि कामें आनंदाने केली. महाराष्ट्र लागतांच ती मनोवृत्ति मावळलेली दिसली.

 माझे स्नेही मि. वाघ एकदां असें ह्मणाले की, आपण परप्रांती गेली होतो म्हणून आपल्याशी लोक जास्त चांगल्यारीतीने वागले असतील व आपणही परप्रांतीय लोकांशी चांगले वागत असू पण त्याची जाणीव आप