पान:लंकादर्शनम्.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



२२

होती. आस्ट्रेलियन युवकाला वाटेंत शिकार न मिळाल्यामुळे बरे वाटले नाहीं तेव्हां रात्री एक मांजर मारून त्याची शेपटा टोपला अडकवून ती आम्हास दाखवून तो आनंदाने परत गेला.

 अनुराधपुरम् गांवांपासून स्टेशन सुमारे १।। मैल लांचे आहे. स्टेशन वर जाण्यास येथे छकेड किंवा झटके मिळतात. सूर्यास्तानंतर आह्मी स्टेशनवर येऊन पोहोंचलों, वारा वाजता कॉलवोहून येणाच्या गाडीत बसून आह्मी सकाळी ७ वाजता तालिमनार येथे येऊन पोहोंचलो. तेथे सकाळी ७ वाजतां बोटींत बसून धनुष्यकोडीला सुमारे ९ वाजतां आलो. प्रथमतः बोटीवर पोर्ट सर्जनला भेटला व त्यांस पासपोर्ट दाखवूने आह्मी परत जाणार आहोत असे सांगितले त्यांनी सर्व मंडळी मोजून पाहिली व आमच्या पासपोर्टवर सही करून तो परत दिला.

 नंतर कस्टम हाऊसमधील अधिकारी वाटीवर चट्टन प्रत्येक इसमाचे सामान पाहू लागले, प्रथमतः त्यांनी फस्टक्लास वे सेकंडक्लास पॅसेंजरचे सामान पाहिले व नंतर थर्डक्लासच्या उतारूंचे सामान पाहिले, या सर्व कामाला सुमारे २|| ते ३ तास लागले.

 यावेळी स्टेशनवर मेल तयार होती. फर्स्ट आणि सेकंडक्लासचे पॅसेंजरला मेलमधून जाण्यास परवानगी मिळते परन्तु थर्डक्लासच्या पॅसेंजरना मेलची तिकिटें देणे किंवा न देणे हे बोटीवरील अधिका-यांच्या मर्जीवर अवलंबून असते व यामुळे तिस-या वर्गाच्या उतारूंस वशीला लावावा लागतो वे वशील्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, मेल नंतर सुटणारी पॅसेंजर मंडपमकडे फार उशीरा जाते म्हणून शक्य तोंवर मैलने जाण्याचा प्रवाशी प्रयत्न करतात.

 आह्मी मेलमधून पंवम् स्टेशनपर्यत आलो तेथून सर्व मंडळी रामेश्वरास गेली. मी तेथून मंडपम् कॅपला गेलो. व तेथील सुपरिंटेंडेंटला भेटलो. त्यांनी मोठ्या आस्थेने आमची सफर कशी झाली वगैरे विचारपूस केली के