पान:लंकादर्शनम्.pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



२०

 आमचे सामान सुमान व्यवस्थितपणे ठऊन बाहेर जातां यावे ह्मणून मी एक खोली देण्याबद्दल भिक्षुस विनविले. त्याने खोली व कुलूप दिले.

 खोली देवळाच्या मागील बाजूस होती. स्वयंपाकास मोकळी जागा, पुढे पटांगण व गोड्यापाण्याची विहीर अशी सर्व सोय होती. आमच्या खोलीच्या शेजारीच एक पंजाबी व्यापारी होता त्याचे जवळ भांडी असून तो स्वयंपाक करीत होता. त्यास स्वयंपाक झाल्यावर ती भांडी आह्मांस देण्याबद्दल मी विनीत केली व ती त्याने मान्य केली. सदरहू व्यापारी कांहीं तेले व औषधे विकीत सीलोन मध्ये फिरत होता. भांड्याची सोय लागल्यावर मी पुन्हां भिक्षुकडे गेलो व त्यास वोलता बोलतां विचारले की भगवान् बुद्धाने पाणाति पाता वे-रमाण' ( प्राण्यांचा वध करू नका ) अशी शिक्षा सांगितली असतां तुह्मी भिक्षुलोक सुद्धां मांसासन कसे करितां ? हे कृत्य धर्म विरुद्ध होत नाहीं काय ?

 भिक्षुने गंभीरपणाने उत्तर दिले. “आह्मी मांस खातो हे खरे आहे पण ते खाण्याला शास्त्राची मनाई नाहीं कारण ‘आदई, असुतं, अपरिशांत खादितुमर्हति ' असे शास्त्र वचन आहे. हे ऐकून मला गम्मतच वाटली. आदळं—जनावर मारतांना आपण पाहिले नाहीं, असुतं—अमक्या माण, सानें अमुक जनावर मारिलें हैं ऐकलें नाहीं, अपारतं-जनावर मारले हे समजले नाही, असे त्रिगुणात्मक रीतीनें जर मांस मिळाले तर खाण्यास हरकत नाही असा भिक्षूच्या सांगण्याचा मथितार्थ होता. मांसाशनास मोकळीक मिळविण्या करितां ज्या धर्माचार्यांनी हें तर्कशास्त्र राचले त्याचे कौतुक करीत मी परत फिरलो.

 नंतर ह्मी देवळांत फिरून पवित्र पिंपळाचे दर्शन घेतले. अनेक स्त्रीपुरुष, फळे व फुले घेऊन देवळांत येत. कांहीं लोक सपत्नीकही येत, त्यांचा पोषाख खिस्ति लोकांसारखा असे. ते हातांतील रुमाल खाली ठेवून त्यावर डोके व गुडघे टेकुन प्रार्थना ह्मणत.