पान:लंकादर्शनम्.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१९

असते. तेव्हा मालकाने आपला एक नातेवाईक १८-२० वर्षांचा आमचे बरोबर दिला, त्याचे जवळ बंदूक होती. थोड्याच वेळाने अंधार पडला, आकाश भरून आले, पाऊस येऊ लागला व भयंकर गर्जना हाऊ लागली. वीज चमकली म्हणजे जिकडे तिकडे भयानक अरण्य दिसे.

 पाऊस जोराने आला तर आढ्यांना पाणी येऊन मोटार कोठे तरी अंडकून पडेल अशी मनांतले मनांत आम्हांस भीति चाटे, एक दोने माणसे तर इतकी गांगरून गेली की ती गप्प बसली. विचारलेल्या प्रश्नाचेही उत्तर देईनात. वरोवरचा आस्ट्रेलियन तरुण आपली बंदूक घेऊन मडगार्डवर जाऊन बसला. पाऊस फारसा आलाच नाही. एखादे जनावर दिसले की आलि शिकार अंशी एकच गर्दी लोक करीत, कित्येकदां आम्ही एखादा खेड्या जवळून जातांना जनावर असल्याची चाहूल लागे, रॉनटी जनावर खरोखरी भेटलेच नाही.आमच्या बरोबरचा तरुणमात्र गोळी झाडग्याकरिता उत्सुकं झालेला होता. परन्तु दरखेपेस आम्ही त्यास परावृत करीत होतो. वाटेंते एक मोठे खेडेगांवे लागले. तेथे चहा, बिस्किटे, नारळ व केळी घेतली व शेवटी रात्री १० वाजता अनुराधेपुरास जाऊन पोहोचलो. तेथेही काही लोकांनी हाटेलांत चहा वगैरे घेतला.

 ती रात्र आम्ही बुद्धमंदिरांत काढली. अनुराधपुरम् येथे शाकीहारी लोकांचे हॉटेले नाहीं हे मला माहित होते. म्हणून थोडा खजूर व इतर थोडे फराळाचे सामान बरोबर आणिले होते. रात्री वे सकाळी तेथे थोडे दूध मिळाले. सकाळी उठल्यावर स्वयंपाकाकारतां भांडी पहावीत ह्मणून देवळांतील भिक्षुकडे जाऊन भांडी मागितली, त्याने भांडी देण्याचे कबूले करून एका माणसास मंजे बरोबर दिले. त्याने भांडी दाखविली पण ती सगळी खापराची त्यांत मांसादि नानापदार्थ शिजविल्यामुळे त्यांस दुर्गधि येत होती. त्यामुळे भांड्याची पंचाईत पडली, वे भांडी मिळण्याचे काम चालुच ठेवले.