पान:लंकादर्शनम्.pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१८

होत्या व खोब-याच्या तेलाचे पंथ्यातून दिवे लावले होते. दिव्यांचा संख्या दाखविणारे कागदी तक्ते जाजोजाग लाविले होते. १००-२०० दिव्यावर देखरेख ठेवणारी माणसे आपापली कामे करीत व वा-याने दिवा विझाल्यास तो पुन्हां लावीत. अशी या दिव्यांची एकच गर्दी होती. हे दिवे पहाण्यास नानाप्रकारचे लोक आले होते, पुष्कळशा बुद्धधर्मीय पुरुषांचा व स्त्रियांचा पोशाख खिस्ति लोकांप्रमाणेच असल्यामुळे स्विस्तिलोक व बुद्धलोक ओळखतां येणें पडत असे, टवाळ लोक सर्वत्र असावयाचेच या नियमानुसार त्या दिव्यांच्या रांगांतून कांहीं मुले व कांहीं मोठे लोकही दिव्यावर देखरेख करणाराची नजर चुकवृन दिवे मालवीत व त्या देखरेख करणारांना पुन्हां दिवे लावावे लागत.

 हे दिवे पहाणे झाल्यावर सुमारे रात्री १२ वाजता आह्मी परत मुक्कामाला गेलो व झोंप काढली. दुसरे दिवशीं अनुराधपुरम् येथे जाण्याचे ठरले. सकाळी उठून आही पुन्हां श्री. कारखाननीस यांचेकडे गेलो. मिसेस कारखाननीस प्रसूत झाल्यामुळे श्री. कारखाननीस त्यांजकडे हॉस्पिटल मध्ये गेले होते. घरी लहान लहान मुलेंच होती.

 आह्मी तेथे स्नाने केली. मुलांनी चहा केला, आम्हांस सुपारी, पान वगैरे घेण्याबद्दल पुष्कळ आग्रह केला. मुलांची वयें १० वर्षांपेक्षा जास्त नव्हती पण कोणत्याहि तन्हेनें न लाजत अगदी मोठ्या माणसाप्रमाणे ती आदरातिथ्य करीत.

 आम्ही १२-१२॥ वाजे पर्यंत वाट पाहिली पण श्री कारखाननीस यांचा भेट झाली नाही. तेव्हां मोटार ठरवून आम्ही परत आलो व खाणावळींत जेऊन मुक्कामास परत गेलो.

 दुपारी ४ चे सुमारास मोटार आली व सामान घेऊन आह्मी निघालो. मोटार आस्त्रालयन गृहस्थाची होती. रस्ता अडचणीचा ह्मणजे अरण्यांतून जाणारा असल्यामुळे रस्त्यांत रानठी टोणग्यांची व हत्तींची भीति