पान:लंकादर्शनम्.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७

कैंडी येथे पोहोचल्यावर एक शाकाहारी लोकांची खाणावळ गांठली व जेवण केले. जेवणानंतर कॅडी पाहून सुमारे ३ मैलावर "पेराडेनिया" नांवाची बाग आहे, ती जाऊन पाहिली या बागेबद्दल सीलोनी लोकांना फार अभिमान वाटतो. जावा बेटांत "ब्यूटेन झोर्ग" नांवाची जगांत पहिल्यानंबरची बाग आहे. तज्ञांच्या मते वनस्पतिशास्त्र दृष्टया ब्यूटेंनझोर्गची बाग पहिल्यानंबरची असली तरी पेराडेनिया बाग ही सौन्दर्याच्या दृष्टीने पहिल्या प्रतीची आहे.

 ही बाग पाहिल्यानंतर आह्मी बुद्धाच्या दांताच्या देवळाकडे गेलो. तेथे पुराण चाललेले होते. काही स्त्रियांचे श्रवणाबरोवर हातांनीं कांहीं काम करणे चालूच होते. बुद्धाची दांत असलेली खाली त्यावेळी लावलेली होती. ती खोली उघडून आम्हांस आंत सोडतात की नाहीं हैं। पहावे म्हणून तेथील भिक्षुकडे आम्ही गेलो व त्यांस आम्हांस आंत सोडा असे विनविले पण बुद्धभिक्षूनी ती विनाति मान्य केली नाहीं.

 कैंडीमधील प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यावर तेथे रात्रीं रहाण्याची प्रथमतः विचार ठरलेला होता पण कांहीं लोकांना परत कोलंबोकडे जावेसे वाटले त्या वरून आम्हीं अगदी दिवस मावळण्याच्या सुमारास तेथून परत फिरलो. कोलवाला येई पर्यंत १०॥ वाजून गेले. कोलंबो येथे एका बुद्ध देवळांत ४४ हजार दिवे लावणार आहेत असे आह्मांस कळाले होते म्हणून आम्ही त्या देवळाचा तपास करू लागलो. बराच तपास केल्यानंतर देऊळ सांपडले. देवळाजवळ गर्दी बरीच होती. आपल्या इकडील प्रमाणेच देवळाबाहेर खाद्य पेय पदार्थ बिक्रीस मांडलेले होते. त्या पदार्थात ऊसही होते. आपला चिवडा मात्र आह्माला सीलोनमध्ये कोणत्याहि दुकानांत विक्री करितां दिसला नाहीं.

 देवळाच्या भोवती बांबू ठोकून दिवे मांडण्यास जागा केली होती, उभ्या बांबूला अर्ध फोडलेले बांबू आडवे बसवून त्यावर पंथ्या मांडिल्या